Advertisement

भेडवळ येथील ३५० वर्षाची परपंरा असलेली घट मांडणी १०मे ला

भेडवळ येथील ३५० वर्षाची परपंरा असलेली घट मांडणी १०मे ला संपूर्ण देशासह राज्यातील राजकीय आणि शेतकऱ्यांचे लक्ष लागून असलेली बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळची घटमांडणी ची ३५० वर्षाची परंपरा आजही जपली जात आहे. या घटमांडणीत वर्तविण्यात आलेल्या अंदाजावरुन राज्यातील शेतकरी आपल्या वर्षभराचं पीक पाण्याचे नियोजन करत असतात. त्यामुळे या घटमांडणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असते. पाऊस, पौक परिस्थिती, हवामान, आर्थिक, संरक्षण व सामाजिक परिस्थिती व देशाच्या राजकीय परिस्थितीचा वेध घेणारी ही देश, राज्य व विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली भेंडवळची घटमांडणी १०जातात. त्यामुळे राजकीय सामाजिक, शेतकरी व सामान्य जनतेत मांडणीची प्रचंड उत्सुकता असते. बुलडाणा जिल्ह्यामध्ये जामोद तालुक्यातील पूर्णा नदीच्या काठी बसलेल्या भेंडवळ या गावी घटमांडणीची ही परंपरा सुमारे साडे तीनशे वर्षापासून सुरू आहे. घटमांडणी १० मे रोजी अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी केली जाईल. मांडणीचे भाकीत ११ मे रोजी पहाटे चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज हे जाहीर करणार आहेत. घटमांडणी नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत राहणार आहे

Post a Comment

0 Comments