प्रतिनिधी जळगाव जामोद
सातपुडा शिक्षण संस्था, जळगांव जामोद द्वारा संचालित व डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्नित स्वातंत्र्यविर गणपतराव इंगळे कृषि व उद्यानविद्या महाविद्यालय, जळगाव जामोद तसेच ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाचे कृषीदुत व कृषीकन्या यांच्या संयुक्त विद्यमाने १० वा आंतरराष्ट्रीय योग दिन दि.२१ जून २०२४ रोजी उत्साहात साजरा करण्यात आला.
राष्ट्रीय सेवा योजना व ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाचे कृषिदुत यांच्या वतीने आयोजित योग दिना निमित्य प्रा.सचिन शिंगणे यांनी विद्यार्थी, स्वयंसेवक, कृषीदुत व कृषीकन्या तसेच प्राध्यापकवृंद यांना प्राणायाम व योग क्रिया तथा सूर्य नमस्कार विधी कशा प्रकारे कराव्यात आणि त्याचे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कशा प्रकारे समावेश करता येईल, याबद्दल मार्गदर्शन केले. त्या नंतर कृषीदुत व कृषीकन्या यांनी परिसरातील १५ दत्तक ग्राम येथे योग आणि आरोग्य संपत्ती याबद्दल सकारात्मक भावना निर्माण करून व्यक्तिमत्त्व विकास घडविण्याच्या दृष्टीने सतत प्रयत्नशील असावे आणि याच माध्यमातून योग दिन साजरा करतांना विद्यार्थी प्रतिनिधी रोहित लोथे (काजेगाव), सारंग क्षीरसागर (बोराळा), अक्षय डामरे (चावरा), मयूर मोहिते (गाडेगांव खुर्द), सागर पाचपोर (अकोला खुर्द), वैष्णवी देवुळकर (खेर्डा बु), साक्षी देशमुख (खेर्डा खु), प्रिती डवले (उटी), वैष्णवी घोगरे, अभिलाषा पिलातर (वडशिंगी), समर्थ ठोकलेकर (सुलज) यांचा तसेच ग्रामस्थांचा उत्कृष्ट असा सहभाग लाभला महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.योगेश गवई तसेच प्रा.अविनाश आटोळे, डॉ.अनिकेत उमाळे आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी व कर्मचाऱ्यांनी सहभाग लाभला.
0 Comments