जळगाव जामोद प्रतिनिधी-
वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हा महासचिव प्रकाश भिसे व जळगाव जामोद तालुका उपाध्यक्ष सुनील बोदडे यांच्या गाडीवर नांदुरा रोड वरील आसलगाव खांडवी दरम्यान अज्ञात इसमांनी दुचाकीवरून येत गाडीवर गोळीबार केल्याची घटना २५ जून रोजी रात्री साडेआठ ते नऊच्या दरम्यान घडली. वंचित बहुजन आघाडीचे युवा महासचिव प्रकाश भिसे व वंचित बहुजन आघाडीचे जळगाव जामोद तालुका उपाध्यक्ष सुनील बोदडे हे नांदुरा वरून कारने जळगाव कडे येत असताना आसलगाव- खांडवी दरम्यान अज्ञात दोन इसमांनी मोटरसायकलवर येऊन त्यांच्या गाडीवर बेशुटपणे गोळीबार केला व नंतर लोखंडी टामीने गाडीच्या काचांवर वार केला. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही हे विशेष. प्रकाश भिसे यांनी समाज सुचकता दाखवत सहकाऱ्यांसह आपले प्राण वाचविले यावेळी सुनील बोदडे यांनी सदर घटनेची माहिती सहकाऱ्यांसह जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिली असता विलंब न लावता जळगाव जामोद पोलीस स्टेशन ठाणेदार आनंद महाजन हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळाचा पंचनामा करून गोळीबार झालेले वाहन पोलीस स्टेशनला नेण्यात आले. यावेळी घटनास्थळावर वंचित बहुजन आघाडीचे तालुका भरातील पदाधिकारी व कार्यकर्ते जमले होते. जळगाव जामोद तालुक्यात राजकीय पदाधिकाऱ्यांवर हमला होणे ही पहिलीच घटना आहे.या हल्ल्यात प्रकाश भिसे व सुनील बोदडे व त्यांच्या सोबत असलेले सहकारी सुध्दा सुखरूप आहेत. गाडीवर हल्ला करणारी व्यक्ती कोण याचा शोध पोलीस घेतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे. पुढील तपास ठाणेदार आनंद महाजन हे करीत आहेत.
0 Comments