जळगाव जामोद अतिवृष्टी अनुदानात 14 नागरिकांचे आर्थिक फसवणूक झाल्या प्रकरणी जळगाव जामोद पोलिसात 14 नागरिकांनी 27 जुलै ला तक्रार दाखल केली आहे या तक्रारीत फिर्यादीने म्हटले आहे की भिकाजी गोविंद दांडगे आसलगाव यांनी आम्हाला दिनांक २२/०७/२०२३ च्या दगफुटी सदृश्य पावसा मुळे झालेल्या नुकसानीची भरपाई शासना कडून मिळवून देतो असे सांगीतले असता आम्ही सर्वांनी महापूराच्या पाण्यामुळे घराचे अतोनात नुकसान झाले त्यामुळे आम्ही श्री. वासूदेव झुराजी दांडगे यांच्या घरामध्ये बसून श्री भिकाजी गोविंद दांडगे यांच्या कडे आमचे आधार कार्ड आणि बँकेचे पासबूक झेरॉक्स इ. कागदपत्रे दिली त्या नंतर जवळपास फेब्रुवारी २०२४ मध्ये आमच्या सर्वाच्या खात्यावर जवळपास ८० हजार ते १ लाख पर्यंत रक्कम जमा झाली आम्हाला मिळालेली रक्कम आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात आल्या मुळे आम्ही सर्वांनी श्री भिकाजी गोविंद दांडगे यांचे कडे याबाबत विचारणा केली असता त्यानी तलाठी यांच्याकडून चुकून तुमच्या खात्यावर जास्त रक्कम टाकल्या गेली व तुम्ही २०टक्के रक्कम तुम्ही ठेवून उर्वरीत ८० टक्के रक्कम आम्हाला परत या असे सांगीतले असता आम्ही सर्वांनी आमच्या खात्यामधून नगदी स्वरुपात व काहींनी ऑनलाईन व्दारे व काहींनी श्री भिकाजी दांडगे यांची सून सौ. लता बसंता दांडगे यांच्या खात्यात रक्कम बँकमधून ट्रान्सफर केली. त्या मध्ये नगदी स्वरूपात काहींनी त्यांचे घरी व काहीचे पैसे घेण्यासाठी त्यांचा मुलगा नामे अशोक व वसंता आणि त्यांचा नातू वैभव हे पैसे घेण्या करीता वारंवार तगादा लावत. त्यामुळे आमचे सर्वांचे ८० टक्के रक्कम ही भिकाजी दांडगे यांना दिली.
आम्हाला सर्वांना 12जुलै 2024 रोजी तहसिलदार जळगांव जामोद यांचे कडून सदरहू पैसे भरण्या बाबत नोटीस आल्या त्यामुळे आम्ही भिकाजी दांडगे व त्यांची मूले यांना याबाबत चौकशी केली असता 'ते पैसे तुम्ही आमच्या कडे दिलेच नसल्याचे तसेच काही वेळेस ते पैसे आम्ही आमच्या कडे न ठेवता तलाठी याना दिल्याचे सांगत आहेत. असे उडवा उडविचे उत्तरे आम्हाला श्री भिकाजी व त्यांची मुले देत आहे आम्ही सर्वजण तहसीलदार यांच्याकडे दिनांक 22 जुलैला हजर झालो असता तहसीलदार यांनी तुम्हाला पीक नुकसानीचे पैसे आल्याचे सांगितले परंतु आमच्याकडे शेती नसल्यामुळे तुमच्या खात्यावर आलेले अनुदान तुम्हाला 29 जुलै पर्यंत परत शासनाला करावे लागतील असे सांगितले आम्ही सर्वांनी भिकाजी दांडगे यांना परत देण्याची मागणी केली असता ते व त्यांची मुले आम्हाला धमकी देत आहे अशा प्रकारे आमची आर्थिक फसवणूक झाली आहे सदर प्रकरणाची चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा असे तक्रारीत म्हटले आहे या तक्रारीवरअरूण महादेव दांडगे. निलेश अरूण दांडगे,
. माधूरी निलेश दांडगे. चेतन अरूण दांडगे. आशा अरूण दांडगे. व्दारकाबाई देविदास दांडगे. अंबादास देविदास दांडगे. शिला अंबादास दांडगे. वासूदेव झुराजी दांडगे. लिलाबाई वासुदेव दांडगे
. संदिप सुपडा दांडगे. सुमन संदिप दांडगे. सुमन गजानन भटकर तर्फे रवि गजानन भटकर. प्रमोद गजानन निमकर्डे या नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत
0 Comments