*सुनगाव ग्रामपंचायतला धूर फवारणीचा पडला विसर...नागरिकांच्या आरोग्यांकडे दुर्लक्ष...*
*हायमास्ट लाईट बनले शोभेच्या वस्तू*
जळगाव जामोद तालुक्यातील सूनगाव ग्रामपंचायत हे साफसफाई कामांच्या दृष्टीने उदासीन दिसत असून सुनगाव ग्रामपंचायत प्रशासनाचे नागरिकांच्या आरोग्याकडे साफ दुर्लक्ष असल्याचे चित्र सुनगाव येथे दिसत आहे.गावामध्ये ठिकठिकाणी पावसाच्या पाण्याची डबके मोठ्या प्रमाणात साचलेले आहेत,यामध्ये डासांची उत्पत्ती झालेली असुन व ठीक- ठिकाणी गवत ही वाढलेले आहे त्यामुळे गावात डासांचे प्रमाण वाढलेले असुन त्यावर तन नाशक फवारणी करून गावातील प्रत्येक वार्डामध्ये डेल्टामेथ्रीन डास नाशक औषधी धूर फवारणी करावी जेणेकरून डासांची उत्पत्ती थांबुन रोगराईला आळा बसेल.गावात मच्छरांचे प्रमाण खूप वाढलेले आहेत त्यामुळे डायरिया ,मलेरिया, कॉलरा ,डेंग्यू इत्यादी प्राणघातक रोगांची लागण गावातील नागरिकांसह लहान मुलांना सुध्दा झालेली दिसत आहे.नागरिकांच्या आरोग्याकडे ग्रामपंचायत सूनगावने संपूर्णपणे दुर्लक्ष केलेले आहे मागील वर्षी ही ग्रामपंचायत सुनगाव कडून धूर फवारणी झालीच नाही तालुक्यातील सर्व गावांमध्ये जवळपास धुर फवारणी झालेली आहे.त्यामुळे सुनगाव ग्रामपंचायत प्रशासनान गावात धूर फवारणी कधी करणार असा प्रश्न नागरिकांना पडला. आहे.यातच गावातील बहुतांश ऐरियातील स्ट्रीट लाईट बंद पडलेल्या अवस्थेत आहेत तर एका-एका हायमास्ट लाईटसाठी दोन लक्ष रूपये खर्चून उभारलेले कित्येक हायमास्ट लाईट बंद पडून फक्त शोभेच्या वस्तू बनलेल्या आहेत.हे हायमास्ट लाईट फक्त नावालाच उभे असुन हा फक्त नागरिकांच्या पैशाचा अपव्यय आहे.
0 Comments