Advertisement

अनाथाचे वृद्धाश्रमाचे मलकापूरमध्ये भूमिपूजन सोहळा संपन्न

अनाथाचे वृद्धाश्रमाचे मलकापूरमध्ये भूमिपूजन सोहळा संपन्न
मलकापूर : प्रतिनिधी नागेश सुरंगे
येथील ओमशांती सेवा समितीच्या वतीने अनाथ वृद्धाश्रमाचे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी आमदार राजेश एकडे आणि उद्घाटक डॉ. विजय पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा झाला.ओमशांती सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष सचिन शांतीलाल भंसाली यांनी या कार्याला पुढाकार घेत डॉ. विजय पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. तर आमदार एकडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली या कार्यक्रमात मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मान्यवरांनी सचिन भंसाली यांच्या हातून समाजकार्य घडो अशी प्रार्थना केली.
यावेळी महादेवराव गावंडे, विजयकुमार डागा, चिंदुच पाटील, अशांत वानखडे, दामोदर शर्मा, राजूभाऊ पाटील, हनुमान जगताप, अजय टप, सुमेरचंद भंसाली, भिकमचंद भंसाली, सचिन भंसाली अमोल टप, जयकुमार राठी, विमल संचेती, रोशन जैन, विजय गोठी, नानाभाऊ येशी, जितेंद्र मेहता, समीर महानकर, किरीट पोपट, सुरेशभाऊ संचेती, शुभम नवले, वौरू कासे, विशाल क्षीनाथ, रोशन जैन, संदेश संचेती, राजू घोडके, डॉ. युसुफखान उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments