Advertisement

मलकापूरात 'बेक्कार' मराठी चित्रपटाचे चित्रीकरण

मलकापूरात 'बेक्कार' मराठी चित्रपटाचे चित्रीकरण
मलकापूर/प्रतिनिधी नागेश सुरंगे 
शहराच्या इतिहासात प्रथमच मोठ्या पडद्यावरील दाखवल्या जाणाऱ्या मराठी चित्रपटाची निर्मिती गजराम फिल्म प्रोडक्शनच्या वतीने होणार आहे. येत्या 6 जुलै रोजी सकाळी1 वाजता क्रीडा संकुल येथे 'बेक्कार' या मोठ्या स्तरावरील चित्रपटाचे चित्रीकरण शुभारंभ आयोजित केला असून परिसरातील लोकांसाठी आनंदाची बाब ठरेल.

लाखोंची गुंतवणूक खर्च करून 'गजराम' फिल्म प्रोडक्शन च्या वतीने 'बेक्कार' या मराठी चित्रपटाची निर्मिती होऊन मोठ्या पडद्यावर दाखवले जाणार आहे. या चित्रपटाचे निर्माते वाजीद कादरी व रामा मेहसरे आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन सुधीर कुमार तायडे आणि रामा मेहसरे आहे. "बेक्कार" या चित्रपटाचे कथालेखन सुधीर कुमार तायडे यांनी केले आहे. तसेच चित्रपटात सेलिब्रिटींना सुद्धा पहावयास मिळणार आहे.

सेलिब्रेटीमध्ये सुरेश विश्वकर्मा
(सैराट फेम), गजेंद्र जाधव (सिंघम रिटर्न फेम), रितू राजे (वन्हाड बाणा फेम) तसेच उत्कृष्ट गायक अजय गोगावले आणि श्रश्रेया घोषाल आदी असणार आहेत. सामाजिक स्तरावर असलेल्या बेरोजगारी या गंभीर प्रश्नावर आधारित चित्रपटाची ही मुख्य कथा आहे. या चित्रपटातील नायक व त्याचे सहनायक बेरोजगारीने पछाडलेले असल्याने राजकीय व प्रशासकीय व्यवस्थेतील भ्रष्टाचारा विरोधात बंड पुकारून जनसामान्यांना न्याय देण्यासाठी पेटून उठलेल्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण शुभारंभ 6 जुलै रोजी दुपारी 1 वाजता क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमासाठी भाई अशातजी वानखेडे कार्यक्रमाचे अध्यक्ष, उद्योगपती संतोष बोरगावकर व उपविभागीय तहसीलदार तायडे, मलकापूर पोलिस निरीक्षक अनिल गोपाळ, रमेशसिह राजपूत, आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे संचालन प्राचार्य कृष्णा मेसरे यांनी केले तर आभार प्रदर्शन सुभाष बावस्कर यांनी केले

Post a Comment

0 Comments