Advertisement

केशव माधव विद्यामंदिराच्या प्राचार्या सौ.सोनाली कुळकर्णी सायन्स ऑलिम्पियाड फॉउंडेशन दिल्ली तर्फे बेस्ट डिस्ट्रिक्ट प्रिन्सिपॉल म्हणून सन्मानीत.

केशव माधव विद्यामंदिराच्या प्राचार्या सौ.सोनाली कुळकर्णी सायन्स ऑलिम्पियाड फॉउंडेशन दिल्ली तर्फे बेस्ट डिस्ट्रिक्ट प्रिन्सिपॉल म्हणून सन्मानीत.
                SOF म्हणजेच सायन्स ऑलिम्पियाड फॉउंडेशन ही संस्था गेली 26 वर्ष विद्यार्थ्यांना विविध परीक्षा घेऊन त्यांच्या अंगी असलेले गुण जोपासायला मदत करते.विविध परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बुद्धी मत्तेला चालना देण्याचे काम SOF ही संस्था गेली 26 वर्ष अव्याहतपणे करीत आहे.यांच्यामार्फत होणाऱ्या विविध स्पर्धा मध्ये केशव माधवचे विद्यार्थी  हिरीरीने भाग घेतात व प्राविण्य प्राप्त करतात.याच कामाच्या उत्कृष्ट नियोजन व अधिकाधिक विद्यार्थी कसे परीक्षेला बसतील व प्राविण्य प्राप्त करून गोल्ड सिल्वर पदक कसे प्राप्त करतील याकरिता विद्यालयाच्या प्राचार्य सौ.कुळकर्णी तसेच त्यांचा सहकारी शिक्षक व शिक्षिका प्रयत्न करीत असतात.
त्यांच्या याच उत्कृष्ट कार्याबद्दल सायन्स ऑलिम्पियाड फॉउंडेशन दिल्ली तर्फे शैक्षणिक सत्र 2023-24 चा बेस्ट प्रिन्सिपॉल अवॉर्ड केशव माधव विद्यालयाच्या सभागृहात प्राचार्या सौ.सोनाली कुळकर्णी यांना प्रदान करण्यात आला.या कार्यक्रमाकरिता संस्थेचे अध्यक्ष अनिल जैस्वाल सचिव अनुप पुराणिक SOF चे जिल्हा संयोजक संदीप कुळकर्णी सहसंयोजिका सौ.कविता कुळकर्णी जळगाव शिक्षण मंडळाचे संचालक अविनाश कुळकर्णी तसेच सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी संयोजक संदीप कुळकर्णी यांनी विद्यार्थ्यांना SOF चे कार्य व याची भविष्यातील उपयोगिता समजावून सांगितली.

Post a Comment

0 Comments