Advertisement

आदिवासी ग्राम निमखेडी येथे अनोखे पर्यावरण पूरक रक्षाबंधन गोमय रक्षा सूत्र बांधून केले रक्षाबंधन साजरे

*आदिवासी  ग्राम निमखेडी येथे अनोखे पर्यावरण पूरक रक्षाबंधन*
*गोमय रक्षा सूत्र बांधून केले रक्षाबंधन साजरे*
       सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या आदिवासी ग्राम निमखेडी येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेत दि 22 ऑगष्ट गुरुवार रोजी महाराष्ट्र राज्य महा एनजीओ फेडरेशन तथा क्रांतीसुर्य बहुउद्देशीय शिक्षण संस्था खेर्डा ता जळगाव जामोद यांचे संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना पर्यावरण पूरक रक्षा सूत्र बांधून रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .
        महा एनजीओ फेडरेशन नेहमीच असे समाज उपयोगी उपक्रम प्रत्येक महिन्यात राबवीत असते. महा एनजीओ फेडरेशनने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा रक्षाबंधन सणासाठी राज्यभरातील शंभर संस्थांना 50 गोमय राख्या दिल्या आहेत.या अभिनव उपक्रमामुळे पर्यावरण रक्षणाविषयी विद्यार्थी तथा नागरिकांमध्ये जाणीवजागृती होऊन गाईचे शेण तथा पंचगव्यापासून बनलेल्या राख्यांमुळे उत्साह तथा कुतुहल निर्माण झाले.
   या उपक्रमासाठी महा एनजीओ फेडरेशन चे संस्थापक तथा महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखरजी मुंदडा व महा एनजीओ फेडरेशनचे  वरिष्ठ संचालक मुकुंजी शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. प्रसंगी जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा निमखेडीचे मुख्याध्यापक उमेश खारोडे, सहाय्यक शिक्षक उमेश भड ,सहाय्यक शिक्षक धनराज इंगळे ,अंगणवाडी सेविका रेखा सोनवणे तथा सर्व विद्यार्थी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments