*भ्रष्टाचारात अडकलेल्या अधिकार्याची नार्को टेस्ट करा.* - प्रसेनजीत पाटिल यांची मागणी.
२२ जुलै २०२३ च्या अतिवृष्टीमधे बाधित शेतकऱ्यांना आणि नुकसाग्रस्तांना शासनाकडून आलेल्या मदतनिधीच्या वाटपात प्रचंड गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले आहे.
शासनाकडून आलेला मदतनिधी नुकसानग्रस्तांच्या खात्यावर वर्ग झालाच नाही, याउलट प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी संगनमताने तालुक्यातील गोर गरीब आदिवासी बांधवांच्या बँक खात्यावर पैसे जमा केले, नंतर आपल्या खात्यावर चुकून शासकीय निधी जमा झाला आहे असं भेडसावून संबंधित आदिवासी बांधवांकडून ती रक्कम रोख स्वरुपात वसूल केली गेली.
म्हणजेच ज्यांच्या खात्यावर पैसे जमा होणे अपेक्षित होते त्यांना एका कवडीची मदत न करता इतरांच्या खात्यावर पैसे जमा करून पुन्हा ते रोख वसूल घेण्यात आला आहे.
हे प्रकरण इथेच थांबले नाही, शासकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या गैर व्यवहाराचा माझ्या गोरगरीब आदिवासी बांधवांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. प्रशासनातर्फे या आदिवासी बांधवांना नोटिसा दिल्या जात असल्याने माझे आदिवासी बांधव तणावाखाली आहेत.
आज या सर्व प्रकरणाचा तिढा सुटावा म्हणून SDO साहेबांची भेट घेवून आर्थिक गैरव्यवहारात अडकलेल्या महसूल अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करावी, संबंधितांवर कडक कारवाई करावी तसेच अतिवृष्टीबाधित शेतकरी आणि नुकसानग्रस्तांना तातडीने मदतनिधी मिळावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार ) पक्षाचे नेते प्रसेनजीत पाटिल यांनी शासनाकडे केली.
0 Comments