जळगाव जामोद दि 5- बांडापिंपळ येथील बैल चोरास जळगाव पोलिसांनी 4 ऑगस्ट रोजी जेरबंद केले आहे. याविषयी फिर्यादी आकाशवालसिंग जंगल यांनी जळगाव जामोद पोलिसात तक्रार दाखल केली आहे दिनांक 4 ऑगस्ट रोजी सकाळी आरोपी नामे काशीराम सदू चमलकार याने फिर्यादीच्या शेतातील वाडग्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करून पंचवीस हजार रुपये किमतीचा बैल चोरून नेला. फिर्यादीने बैलाचा शोध घेतला असता बैल आरोपीजवळ मिळून आला अशी तक्रार पोलिसात देण्यात आली फिर्यादीच्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम 305 3(5 )नुसार गुन्हा दाखल केला आहे. सदर आरोपीला पोलिसांनी जेरबंद करून दिनांक पाच ऑगस्ट रोजी न्यायालयासमोर हजर केले आहे. सदर घटनेचा पुढील तपास ठाणेदार महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नायक पोलीस कॉन्स्टेबल इरफान शेख करीत आहे
0 Comments