ग्रामपंचायत सूनगाव ने वैद्यकीय अधिकाऱ्याच्या पत्राला दाखवली केराची टोपली
जळगाव जामोद तालुक्यातील सूनगाव ग्रामपंचायत हे साफसफाई कामांच्या दृष्टीने उदासीन दिसत असून सुनगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याचे चित्र सुनगाव येथे दिसत आहे ठिकठिकाणी पावसाच्या पाण्याची डबके साचलेले आहे मध्ये डासांची उत्पत्ती झालेली आहे व ठीक ठिकाणी गवत हे वाढलेले आहे त्यामुळे गावात डासांचे प्रमाण वाढलेले आहे त्यावर तन नाशक फवारणी करावी व गावात धूर फवारणी करावी गावात मच्छरांचे प्रमाण खूप वाढलेले आहेत त्यामुळे डायरिया मलेरिया कॉलरा डेंग्यू इत्यादी प्राणघातक रोगांची लागण झालेली दिसत आहे या नागरिकांच्या आरोग्याकडे ग्रामपंचायत सूनगावने संपूर्णपणे दुर्लक्ष केलेले आहे मागील वर्षी ही ग्रामपंचायत सुनगाव कडून सुनगाव मध्ये धूर फवारणी झालीच नाही तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत मध्ये जवळपास दूर फवारणी झालेली आहे त्यातच सतत वीस ते पंचवीस दिवस पाऊस चालू असताना गावात पावसाचे पाणी साचलेले जागोजागी डबके आहे त्यामध्ये डासांची मोठी उत्पत्ती झालेली आहे व सुनगाव येथे पोटाचे विकार व तापीचे आजार या रोगांनी सुनगाव पूर्णपणे ग्रासले आहे तरी पण सुनगाव ग्रामपंचायत कडून सुनगाव वासियांना आरोग्याच्या मूलभूत सुविधा पुरविण्यात येत नाही जसे पिण्याचे योग्य पाणी व धूर फवारणी तर केलीच नाही अशा बातम्या प्रसारित होताच सतत चालू असलेल्या पावसामुळे रोगास अनुकूल वातावरण असताना वैद्यकारी अधिकारी यांनी खबरदारी घेऊन ग्रामपंचायतला 30 7 2024 रोजी पत्र दिलेले आहेत त्या पत्रात साथ रोग उद्भवणार नाही यासाठी एकूण नऊ उपाय योजना करण्याच्या सूचना असलेले पत्र प्राप्त झालेले आहे ग्रामपंचायतला दिलेल्या आहेत परंतु परंतु पाच ते सहा दिवस उलटूनही ग्रामपंचायत प्रशासनाने यातील उपाययोजना किंवा मार्गदर्शन सुनगाव येथील नागरिकांना केलेच नाही व वैद्यकीय अधिकाऱ्याचे पत्राला केराची टोपली दाखविण्याचे काम सुनगाव ग्रामपंचायत ने केले आहे
0 Comments