Advertisement

मलकापूर मतदार संघ मनसे लढण्यासाठी तयारीत

मलकापूर मतदार संघ मनसे लढण्यासाठी तयारीत                                          
      महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा राज ठाकरे यांचा नुकताच झालेल्या विदर्भ दौऱ्या नंतर पक्षकडून विधानसभा निवडणुकीसाठी मलकापूर मतदार संघातही उमेदवार देण्याचे संकेत स्पष्ट झाले असून पक्षाचे ज्येष्ठ नेते श्रीकृष्ण सपकाळ यांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे .
     राज्य भरात विधान सभा निवडणूकीची लगबग लागली असून सध्या सर्वात जास्त चर्चेत असलेले राज साहेब हे नुकतेच विदर्भ दौऱ्यावर असताना त्यांनी काही उमेदवार जाहीर केलेले आहे विदर्भ दौर्याचा शेवटचा टप्पा शेगाव येथे झालेल्या बैठकीत बुलढाणा जिल्ह्यात काही जागा लढविणार असून मलकापूर मतदार संघाचा त्यात समावेश असल्याचे बोलले जात असून पक्ष स्थापणे पासून एकनिष्ठ असलेले तसेच विविध माध्यमातून जनतेसाठी काम करणारे श्रीकृष्ण सपकाळ यांनी २००९ मध्ये पक्षा तर्फे निवडणूक अर्ज भरला होता परंतु एन वेळेवर जनसुराज्य बरोबर युती झाल्यामुळे माघार उमेदवारी रद्द झाली होती आता पक्ष स्वबळावर लढणार असल्याने पक्षातील एकनिष्ठा व दांडगा जनसंपर्क असल्याने पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या कडून उमेदवारी साठी श्रीकृष्ण सपकाळ यांचे नाव एकमताने पुढे करण्यात येत असल्याने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे राज्यातील राजकारणाची स्थिती पाहता आता मनसे हि रिंगणात उतरल्याने हि निवडणूक अधिक रंगतदार होणार असल्याची चर्चा मतदार संघातही पाहायला मिळते

Post a Comment

0 Comments