जळगाव जामोद मतदारसंघात एकीकडे काही भागात नागरिकांसाठी विकास कामांचा मोठ्या प्रमाणात गाजा वाजा होत असताना दिसत आहे. तर जळगाव जामोद मतदारसंघात येत असलेल्या सातपुडा पर्वता मधील आदिवासी भागात कुठल्याच प्रकारच्या तेथील नागरिकांसाठी मूलभूत सुविधांची अंमलबजावणी करताना शासन आणि प्रशासन खूप मोठ्या प्रमाणात कमी पडताना दिसत आहे.
गोमाल या आदिवासी गावामध्ये जाण्यासाठी भिंगारा येथून जावे लागते भिंगारा ते गोमांल या गावातील साधारणतः अंतर हे 10 ते 15 किलोमीटर असे आहे .
10 ते 15 किलोमीटरचा प्रवास करताना 3 नद्या आणि 5 बेंड्या पार करताना जीवमुठी मध्ये घेऊन हा प्रवास करत गोमल या गावी आपण पोहोचू शकतो.
गोमाल या आदिवासी गावांमध्ये डायरिया सारख्या साथीच्या रोगांनी थैमान घातला आहे. गोमाल या गावी आदिवासी बालकांचे प्रमाण खूप जास्त आहे. तसेच आदिवासी बालकांमध्ये कुपोषणाचे लक्षण मोठ्या प्रमाणात दिसून आले.अशातच जळगाव जामोद तालुक्यातील सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ निमा संघटनेचे तालुकाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडीचे, डॉ.सतिश प्रल्हाद शिरेकार यांनी अति दुर्लक्षित गोमाल या गावी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करून मोफत औषधी वाटप केले. सदर शिबिरासाठी त्यांनी स्वखर्चातून औषधे उपचार सुरू केले. सदर शिबिरासाठी सदर शिबिरासाठी डॉ.सतिश प्रल्हाद शिरेकार बालरोग तज्ञ, डॉ.राहुल तानकर, पंकज नागपुरे सर, रणीत सर, सुनील भटकर, सुनील वानखडे, योगेश म्हसाळ, बंटी डोंगरदिवे, मराठे आबा, सखाराम मुजलदा, दिनेश मसाने आदी आरोग्य सेवक तसेच इतर आदिवासी बांधवांनासोबत घेऊन गोमाल या गावी आदिवासी बांधवांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन त्या ठिकाणी करण्यात आले. आदिवासी भागात सुरू असलेल्या शासकीय आरोग्य यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांशी चर्चा करत असताना त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी आहेत पण काही औषधांचा तुटवडा दिसून आला असल्याने अत्यावश्यक औषधे त्या ठिकाणी शासकीय आरोग्य कर्मचाऱ्यांना सुपूर्त करण्यात आले.गोमाल या आदिवासी भागातील नागरिकांनी या शिबिराचा खूप मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.
वंचित बहुजन आघाडीचे डॉ.सतिश शिरेकार यांनी आदिवासी बांधवांसोबत चर्चा करताना असे लक्षात आले की या गावांमध्ये विद्युत पुरवठा, शुद्ध पिण्याचे पाणी, शिक्षण, आणि मुख्य म्हणजे दळणवळणासाठी रस्ते या मूलभूत गरजांची खूप मोठ्या प्रमाणात अभाव असल्यामुळे आदिवासी वर्ग मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे दिसून आले
0 Comments