*श्री शिवशंकर मित्र मंडळाचा स्तुत्य उपक्रम.. स्वर्गवासी संदीप तेटू यांच्या स्मृती प्रित्यर्थ मोफत नेत्र तपासणी शिबीर संपन्न.
सुनगाव येथील श्री शिवशंकर मित्र मंडळाचे सदस्य स्वर्गवासी संदीप शेषराव तेटू यांचा काही महिन्यापूर्वीच सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाला.. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ तसेच गणेश उत्सवानिमित्त श्री शिवशंकर मित्र मंडळाच्या वतीने आज दिनांक १२ सप्टेंबर रोजी भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिर व मोफत चष्मे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी सुनगावचे ग्रामदैवत श्री आवजीसिद्ध महाराज व स्वर्गवासी संदीप तेटू यांच्या प्रतिमेचे पूजन करुन मोहनराव नारायणा नेत्रालय नांदुरा जिल्हा बुलढाणा शाखा जळगाव जामोद येथील तज्ञांच्या सल्ल्याने गरजू नेत्र रुग्णांचे डोळे तपासून त्यांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. श्री शिवशंकर मित्र मंडळाने आयोजित केलेल्या मोफतव व नेत्र तपासणी शिबिराला काँग्रेस पक्ष नेत्या डॉक्टर स्वातीताई वाकेकर व बालरोग तज्ञ डॉक्टर संदीप वाकेकर, बालरोग तज्ञ तथा वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते डॉक्टर सतीश शिरेकार यांनी भेट देऊन श्री शिवशंकर मित्र मंडळाने आयोजित केलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिराचे कौतुक केले. यावेळी डॉक्टर सतीश शिरेकार यांनी पंधरा रुग्णांच्या चष्म्याचा खर्च श्री शिवशंकर मित्र मंडळाला दिला. या मोफत नेत्ररोग तपासणी शिबिराचा शेकडो च्या वर रुग्णांनी लाभ घेतला. यावेळी श्री शिवशंकर मित्र मंडळाचे सर्व सदस्य, गावातील नागरीक यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. नेत्र रोग तपासणी शिबिराच्या यशस्वीतेसाठी श्री शिवशंकर मित्र मंडळाने परिश्रम घेतले.
0 Comments