मलकापूर नगर परिषद, जि. बुलढाणा
मलकापूर नगरपरिषद मार्फत दिव्यांग लाभर्थ्यांची नाव नोंदणीसाठी अंतिम मुदतवाढ मलकापूर नगरपरिषदे मार्फत एकूण ३६२ दिव्यांग लाभर्थ्यांची नाव नोंदणी झाली असून, कोणीही दिव्यांग लाभापासून वंचित राहू नये याकरिता व अंतिम यादी तयार करावयाची असल्याने आता अतिंम मुदतवाढ दिनांक ३०/०९/२०२४ पर्यंत देण्यात येत आहे. नगर परिषद मलकापूर मार्फत दिव्यांगांची नाव नोंदणी दिनांक ३०/०९/२०२४ पर्यंत करण्यात येत आहे. त्यानंतर येणाऱ्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. तसेच नाव नोंदणी करताना दिव्यांग UPID कार्ड किंवा online दिव्यांग प्रमाणपत्र, आधारकार्ड, बँक पासबूक, इत्यादी कागदपत्रे दिव्यांग नोंदणी अर्जासोबत जोडण्यात यावे व सदर अर्ज आवक जावक विभागात जमा करण्यात यावा. दिव्यांग नोंदणी अर्ज नगर परिषदेच्या खालील झेरॉक्स दुकानात उपलब्ध आहेत.
मलकापूर दि.२४.९.२०२४ मुख्याधिकारी मलकापूर नगर परिषद
0 Comments