पत्रकाराला धमकी देणे सरपंचाला पडणार महागात
-जळगाव जामोद तालुक्यातील सुनगांव येथील स्थानिक पत्रकार अनिल भगत हे दै.महासागर चे तालुका प्रतिनिधी असुन व्हाईस ऑफ मीडिया चे तालुका सचिव आहेत.यांनी गावातील कुशीत पाणी पुरवठा संदर्भात बातमी प्रकाशित केली होती ती बातमी बघुन सरपंच रामेश्वर अंबडकार सुनगांव यांनी पत्रकार यांना २१सप्टेबर ला सायंकाळी ७:३०ला फोन द्वारे धमकावले होते.त्या घटने संदर्भात २२सप्टेबर ला पो.स्टे. जळगाव जामोद ला तक्रार दिली व आज दि. २३ सप्टेंबर ला तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक यांच्या मार्फत जिल्हा पोलिस अधीक्षक यांना निवेदन देऊन पत्रकार कायदा अंतर्गत गुन्हा नोंद करण्याची मागणी केली सदर निवेदनाच्या प्रतिलीपी उपविभागीय अधिकारी व गटविकास अधिकारी यांना देण्यात आल्या यावेळी व्हाईस ऑफ मीडिया चे तालुका अध्यक्ष गुलाबराव इंगळे, जयदेव वानखडे, विनोद वानखडे, प्रितम ठाकुर,राजेश बाठे, मंगेश राजनकर,मंगल काकडे, अनिल भगत, संतोष कुलथे, विनोद चिपडे, गणेश भड, सागर झनके, राजकुमार भड, शिवदास सोनोने,गजानन सोनटक्के, अमोल भगत,अमोल दाभाडे सह तालुक्यातील बहुसंख्य पत्रकार बांधव उपस्थित होते.
0 Comments