महावितरणचा भोगळ कारभार सण उत्सवाच्या काळात सुनगाव वाशियांची बत्तीगुल
उत्सवाच्या काळात महावितरण ची मनमानी सुरू असून, सुनगांव येथे गत काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. कधी रात्री तर कधी दिवसा वीज पुरवठा खंडीत होत राहत असल्याने ग्रामस्थांना खुप प्रमानात त्रास होत आहे. ही वीज समस्या दुर्लक्षित असून .नेमका हा फोल्ट आहे तरी काय? कि लाईट ही दिवसा मधुन 10 ते 15 वेळेस जात येत राहतो पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे डासांचे प्रमाण खुप आहे कुणाच्या घरी लहान मुले तर कुणाच्या घरी पेशन्ट आहे डासांन पासुन मलेरीया किंवा डेन्गु कुणाला झाल्यास याला जबाबदार कोण? ही वीज दुरुस्ती कोण करणार? हा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. गेल्या तीन महिन्या अगोदर शून्या सुनगांववाशी यांनी महावितरण कार्यालयासमोर खूट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते
18 जुन 2024 रोजि महावितरण अभियंता जळगांव जामोद यांनी सुनगांवचा विज पुरवठा एका महिन्यात शनि मंदिर सबस्टेशन वरून सुरळीत करून देऊ असे लेखी आश्वासन देऊनही विद्युत वितरण कंपनीने अजूनही सुनगावचा विद्युत पुरवठा नियमित केलेला नाही
महावितरणच्या ऊमापुर सबटे्शन अर्तरगत येत असलेल्या सुनगांव येथे हा प्रकार खुप दिवसांपासून वीजेचा लपंडाव सुरू आहे. वीज पुरवठा खंडीत झाल्यास पूर्ववत होण्यास बराच वेळ लागतो. त्यामुळे, . परिणामी वीज पुरवठा सुरळीत सुरू न झाल्यास ग्रामस्थांनी आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. जळगांव जामोद येथील अभियंता यांच्याशी संपर्क केला असता त्याचा फोन लागत नाही , अशा संतप्त भावना नागरीकां कडुन व्यक्त होत असून सुरळीत वीज पुरवठा मिळावा असी मागणी जनतेकडून केली जात आहे.
0 Comments