*मोठी बातमी मलकापूर मधून नळगंगा धरणाचे 11 दरवाजे उघडल्यानंतर मलकापूर शहरांमध्ये पाणीच पाणी*
मलकापूर ,दिनांक ११ रोजी नळगंगा धरण 100% भरल्याने रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास नळगंगा धरणातून 11 दरवाजातून दोन फूट पाण्याचा विसर्ग करण्यात आला त्यानंतर नळगंगा नदीला मोठा पूर आल्याचे दिसून येत आहे. नळगंगा नदीला आलेला पूर हा 2006 नंतर आलेल्या महापुरानंतर पहिल्यांदाच एवढा मोठा पूर आल्याचे बोलल्या जात आहे. नळगंगा नदीला आलेला पूर पाहण्यासाठी नदीकाठच्या नागरिकांनी गर्दी केली असून नदीकाठी राहत असलेले रहिवासी भयभित झाले आहे.
नदीकाठील मलकापूर येथील नागरिकांनी सतर्कता बाळगावी पुढे तीन ते चार तास पाण्याच्या संसद दोन फुटाणे सुरूच राहील आताची परिस्थिती अशी आहे की मलकापूर शहरांमध्ये नदीकाठी जेवी नगर पारपेट व नदी काढण्यात राहणारे वस्ती मध्ये धरणामधून सोडलेल्या पाण्याच्या कारणामुळे सर्व मलकापूर मध्ये पाणी शिरल्याने आहाकार होत आहे काही जीवाची हानी झाली नाही व नागरिक तरस्थ झाले आहे या कारणाने जनतेच्या वतीने एकच आशा आहे की गोरगरिबांची जी नुकसान झाले आहे ते तात्काळ पाहणी करून शासनाचे वतीने मदत करण्यात यावी
0 Comments