Advertisement

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार ) पक्षाचे नेते प्रसेनजीत पाटिल आक्रमक. टाळ वाजवत शेतकऱ्यांचा जागर.

*शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार ) पक्षाचे नेते प्रसेनजीत पाटिल आक्रमक. टाळ वाजवत शेतकऱ्यांचा जागर.*
          



शरद पवार गटाचा आठवण मोर्चा
2009 मध्ये पाशा पटेल आणि देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या मोर्चा ची करून दिली आठवण.बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे शरद पवार गटाकडून प्रसेनजीत पाटील यांच्या नेतृत्वात आठवण मोर्चा काढण्यात आला यामध्ये 2009 मध्ये कापसाला 6 हजार चा भाव द्या यासाठी देवेंद्र फडणवीस आणि पाशा पटेल यांनी वारकरी मोर्चा काढला होता मात्र आता तेच देवेंद्र फडणवीस सत्तेत आहेत मात्र त्यांना केलेल्या आंदोलनाचा विसर पडला असून त्यांना त्या आंदोलनाची आठवण करुन देण्यासाठी शरद पवार राष्ट्रवादी गटाकडून आठवण मोर्चा काढण्यात आला त्यामध्ये टाळ मृदंग घेऊन आंदोलवनकर्ते सहभागी झाले होते कापसाला किमान 6 हजार तरी भाव द्या अन्यथा येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देणात आला. यासोबतच कापसाला 10 हजार रु क्विंटल भाव, 2023 सालातील खरीप व रब्बी पिकाचा मंजूर पिकवीमा तात्काळ वाटप करण्यात यावा या मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार ) पक्षाच्या वतीने प्रसेनजीत पाटिल यांच्या नेतृत्वात आक्रमक आंदोलन करण्यात आले. या मागण्यांची दखल न घेतल्यास जनताच आता या तिघाडी सरकारला घरी बसवेल असा ईशारा राष्ट्रवादीचे नेते प्रसेनजीत पाटिल यांनी सरकारला दिला.
     यावेळी राष्ट्रवादी नेते प्रसेनजीत पाटिल, विश्वासराव भालेराव, पराग अवचार, एम.डी. साबीर, प्रमोद सपकाळ, सौ. वर्षा वाघ,ईरफान खान,संजय ढगे, महादेव भालतडक,मोहसीन खान,मंगल डोंगरदिवे, सिद्धार्थ हेलोडे, आशिष वायझोडे, विठ्ठल घुले, एकनाथ ताठे, सुभाष कोकाटे, वामनराव गुडेकर,भास्कर येऊल, गुणवंत वाघ, हनुमंत देशमुख, प्रकाश वानखडे, जितेंद्र चहल,रमेश वायझोडे, शालिग्राम रोठे,कैलास झाटे, गजानन रोठे, रेहान अहमद, पवन वाघ, फिरोज खान, एकनाथ अढाव,निजाम राज,रोहित पवार, रामचंद्र वाघ, शेख मोहिद्दीन, प्रफुल नितवणे यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments