जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी आमरण उपोषण
वर्धा जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी मागील दहा वर्षापासून सातत्याने लढा सुरू आहे 2 ऑक्टोबर पासून सेवाग्राम वर्धा येथून महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेने आंदोलन सुरू केले शहरातील सिव्हिल लाईन परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ उपोषणास प्रारंभ झाला आहे राज्याध्यक्ष रितेश खांडेकर राज्यसचिव गोविंद उगले यांचे नेतृत्वात आंदोलन प्रमुख नदीम पटेल शैलेश राऊत मिलिंद सोळंकी प्रवीण बहादे संजय सोनार प्रशांत विघे राजीव गावंडे भारत पारखे प्रमोद खोडे श्याम बागडे हे पेन्शन शिलेदार आमरण उपोषणासाठी आजपासून बसलेले आहेत उद्या गुरुवार यामध्ये आणखी शिलेदारांची संख्या वाढणार आहे उपोषणाला पहिल्या दिवशी शिक्षक आमदार सुधाकर अडबालेआणि पदवीधर आमदार अभिजीत वंजारी यांनी भेट देऊन संघटनेच्या मागणीला पाठिंबा दिला उपोषण सोडण्याचे सुद्धा विनंती केली ती न स्वीकारता आपण आपल्या मागणीवर ठाम आहोत या उपोषणाला वैद्यकीय जनजागृती मंच अध्यक्ष डॉक्टर सचिन पावडे यांच्यासह अनेक त्यांनी भेटी देऊन समर्थन जाहीर केले उपोषण स्थळी सुशील गायकवाड हेमंत पारधी प्रफुल कांबळे प्रमोद खोडे मनोज पालीवाल अशीच बोटे आणि वर्धा शाखेचे असंख्य पदक अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित आहेत
0 Comments