Advertisement

रोटी ते भोटा,भोटा ते कालवड रस्ता डांबरीकरण करण्यात यावा अन्यथा सदर रस्त्यावर म.न.वि.से. करनार ११ आॅक्टोबर रोजी म.न.से. स्टाईलने आंदोलन - म.न.वि.से.

*रोटी ते भोटा,भोटा ते कालवड रस्ता डांबरीकरण करण्यात यावा अन्यथा सदर रस्त्यावर म.न.वि.से. करनार ११ आॅक्टोबर रोजी म.न.से. स्टाईलने आंदोलन - म.न.वि.से.*
*नांदुरा :* तालुक्यातील भोटा ते रोटी सुमारे १.५ किमी रस्ता तसेच भोटा ते कालवड ०३ किमी रस्ता सुस्थितीत नसून सदर रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामधील रोटी ते भोटा सदर रस्ता तर स्वातंत्र्य प्राप्तीपासुन आतापर्यंतही पुर्णत्वास गेलेला नाही. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची आग्रही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. मनसे विद्यार्थी सेना या रस्त्याठी सतत पाठपुरावा देखील  करत आहे. २८ सप्टेंबर २०२२ रोजी जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग मलकापूर येथे सदर रस्ताचे डांबरीकरण करण्यात यावे यासाठी उपोषण देखिल केले होते. लेखी आश्वासन मिळाल्यानंतर सदर उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले होते. मात्र रस्ता अद्यापही पुर्णत्वास गेलेला नसल्याने आज दिनांक ०३ आॅक्टोबर २०२४ रोजी मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग मलकापूर यांना मनसे राज्य उपाध्यक्ष विठ्ठल भाऊ लोखंडकार, मनसे माथाडी कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष श्रीकृष्ण सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे विद्यार्थी सेनेचे उपजिल्हाध्यक्ष शिवचरण पारस्कर पाटील व मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हा सचिव राहुल चोपडे यांनी निवेदन दिले आहे.
सदर निवेदनाची दखल न घेतल्यास महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने दिनांक ११ आॅक्टोबर २०२४ रोजी म.न.से. स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे .
सदर निवेदनावर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपजिल्हाध्यक्ष शिवचरण पारस्कर पाटील व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हा सचिव राहुल चोपडे यांच्या सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments