Advertisement

माजी मंत्री आ.डॉ.संजय कुटे यांचा पाचव्यांदा दणदणीत विजय.. प्रतिस्पर्धी उमेदवार स्वातीताई वाकेकर यांचा पराभव...

माजी मंत्री आ.डॉ.संजय कुटे यांचा पाचव्यांदा दणदणीत विजय.. प्रतिस्पर्धी उमेदवार स्वातीताई वाकेकर यांचा पराभव...

जळगांव (जामोद) मतदारसंघात अखेर महायुतीचे  डाॕ.संजय कुटे  19 हजार 731 मते मिळून  5 व्यांदा विजयी.
 जळगाव (जामोद) विधानसभा मतदारसंघात अटीतटीची निवडणूक होणार असल्याने कोण विजयी होणार !ह्याकडे मतदार संघासह जिल्ह्याचे लक्ष लागले होते. शेवटी अखेर महायुती मित्र पक्षाचे उमेदवार  आमदार डॉ. संजय कुटे यांनी आपले प्रतिस्पर्धी डाॕ.स्वाती वाकेकर यांचे विरुद्ध 19हजार 731 मताने पाचव्यांदा विजयी झालेत. त्यामुळे सर्वत्र त्यांचा विजयाचा जल्लोष होत असून आज  दुपारीच आ.डाॕ.संजय कुटे  मुंबई करता रवाना झाले आहेत.


       जळगाव (जामोद) विधानसभा मतदारसंघात शेगाव ,संग्रामपूर, जळगाव (जामोद) ह्या तीन तालुक्याचा समावेश असून मतदारसंघात 317 मतदान केंद्र होती. मतदार संघात एकूण 3 लाख 6 हजार 414 मतदार होते ,त्यापैकी 20 / नोव्हेंबर रोजी 2 लाख 25 हजार 326 मतदारांनी तर पोस्टल बॅलेट पेपरद्वारे 2083  मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून पोस्टर बॅलेट पेपरमध्ये डॉ संजय कुटे यांना 932 मते तर  डाॕ.स्वाती वाकेकर यांना 957 मध्ये मिळाले असून इतर 7 उमेदवारांना 179 मते मिळालीत. 15 मते  नोटा आहेत. प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेद्वारे 2 लाख 25 हजार 326 मतदारांमध्ये विद्यमान आमदार डाॕ. संजय कुटे यांना 1 लाख 6 हजार 86 मते तर प्रतिस्पर्धी डाॕ.स्वाती वाकेकरा  
यांना 87 हजार 590 मते,डाॕ. प्रवीण पाटील यांना 17 हजार 515मते,तर  प्रशांत दिक्कर यांना 9 हजार 994 मते इतर पाच उमेदवारांना 2,583 मते मिळाली असून नोटासाठी 1 हजार 304 मते, तर नो टेंडर 7 मते आहेत. एकंदरीत पाहता आमदार डॉ संजय कुटे  यांना 19 हजार 731 मध्ये मिळून ते पाचव्यांदा विजयी झालेत  त्यांनी आपले प्रतिस्पर्धी डॉ. स्वाती वाकेकर यांचा पराभव केला आहे, ह्या निवडणूक मतमोजणीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून  जळगाव (जामोद) चे तहसीलदार पवन पाटील, संग्रामपूरचे तहसीलदार प्रशांत पाटील, मुख्याधिकारी सुरज जाधव, तिन्ही आर ओ. तसेच पश्चिम बंगालच्या आयएस अधिकारी ,निवडणूक निरीक्षक श्रीमती सीमा सरदार यांनी काम पाहिले. ह्या निवडणूक साठी 14 टेबल ठेवण्यात आले होते. त्यात 23 फेऱ्या करण्यात आल्यात. ह्याकरीता 66 अधिकारी , नायब तहसिलदार,मंडळ अधिकारी ,173 इतर कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, होमगार्ड तसेच इतर राज्यातील पोलीस संरक्षण अधिकारी, जवान बंदोबस्तासाठी होते. निवडणुकीसाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. निवडणूक शांततेत पार पडली. अशी माहिती निवडणूक विभागाचे अव्वल कारकून सत्यविजय जाधव यांनी दिली आहे.

 [जळगाव (जामोद) विधानसभा मतदारसंघात अत्यंत अटीतटीची निवडणूक होवून विकास पुरुष म्हणून महायुती मित्र पक्षाचे उमेदवार आमदार डाॕ.संजय कुटे हे पाचव्यांदा विजयी  होवून त्यांनी माजी आमदार कृष्णराव  इंगळे यांची कन्या डाॕ.स्वाती वाकेकर ह्या दुसऱ्यांदा निवडणुकीत विजय होणारच !अशी खात्री असतांना सुद्धा त्या 19 हजाराराचे वर मतांनी पराभूत झाल्यात. तर वंचितचे डॉ. प्रवीण पाटील यांना तिसऱ्या क्रमांकावर आणि स्वराज्य महाशक्तीचे प्रशांत डिक्करा  यांना चौथ्या क्रमांकावर राहावे लागले .सदर विजय हा महायुती मित्र पक्षाचा झाल्याने  सर्वात प्रथम जळगाव जा.येथे विजयी आ.डाॕ,संजय कुटे यांचा जयघोष करुन त्यांचेसह जल्लोषात त्यांचे घरापर्यत मिरवणूक काढण्यात आली.तर संग्रामपूर व  शेगाव तालुक्यात  विजयी होताच दुपारपासून गावागावात सर्वत्र जल्लोष साजरा करण्यात आला.]

Post a Comment

0 Comments