राष्ट्रीय किसान एकता महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी आझारुल्ला खान अमानुल्ला खान यांची निवड, तर अमरावती विभागीय महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी सरला ससाने यांची नियुक्ती बद्दल स्वागत सन्मान सत्कार !!.
जळगाव जा - दिनाक 3/12/2024 रोजी दुपारी जळगाव जामोद येथे नव नियुक्ती बद्दल स्वागत सन्मान सत्कार आला,देशातील शेतकऱ्यांना न्याय मिळावा ह्याकरीता या वेळी जळगाव जा शहरातील अझारुल्ला खान अमनुल्ला खान यांची नुकतीच महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली तसेच सौ सरला राजेन्द् ससाणे संग्रामपूर शहरातील शहरातील एक महिला म्हणून किसान एकता महासंघाच्या अमरावती विभागीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली दोन्ही नियुक्त्या ह्या राष्ट्रीय सचिव देवेंद्र सिंह सोमवंशी ठाकूर यांनी त्यांची नुकतीच केली असून
भारत देशातील महाराष्ट्रातील तसेच अमरावती विभागातील सर्व सामान्य जनतेच्या व शेतकरी , कष्टकरी बांधवांच्या न्याय हक्कासाठी बुलंद आवाज उठवण्याकरीता महिलांची आवश्यकता आहे, त्या दृष्टिकोनातून संग्रामपूर शहरातील पत्रकार राजेंद्र ससाने यांच्या अर्धागिंनी सरला ससाने यांची किसान शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार याकरीता राष्ट्रीय किसान एकता महासंघाचे वतीने दोन्ही नियुक्ती केली आहे. त्यांच्या नियुक्ती बद्दल त्यांचे अभिनंदन सन्मान व सत्कार करण्यात आला सर्वत्र कौतुक होत आहे.त्यांनी शेतकऱ्यांसाठी आवाज उठवून न्याय मिळवून द्यावा.अशी त्यांचेकडून अपेक्षा करण्यात आली त्यावेळी सौ,संगीता कोंडे,सौ स्वातीताई उगले,सौ, तुळसाबाई देवकर,सौ पुष्पाताई धोटे,देवेंदरसिंग सोमवंशी ठाकूर ,लियाकत खान,मनोज सानांसे,सुनील लोखंडे,आझरुल्ला खान अमणुल्ला खान व सौ सरला ससाणे यांची उपस्थिती होती
0 Comments