मा . प्रतापराव जाधव ( केंद्रीय आयुष मंत्री तथा खासदार ) ह्यांना Eps95 पेंशन वाढ बाबत राष्ट्रीय संघर्ष समिती मार्फत निवेदन सादर!
दि. 01/12/2024 रोजी राष्ट्रीय संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. कमांडर श्री अशोक राऊत साहेब यांचे दिशानिर्देश व आदेशानुसार,खासदार बुलढाणा लोकसभा मतदार संघ आणि केंद्रीय आयुष्य मंत्री मा. श्री. प्रतापराव जाधव साहेब ह्यांचे कार्यालया समोर बैठा सत्याग्रह करण्यासाठी बुलडाणा जिल्हयातिल चिखली, मेहकर, मलकापूर खामगाव , नांदुरा, संग्रामपूर ' मोताळा, जळगांव (जा ) जवळपास सर्वच तालुक्यातून बहुसंख्य पदाधिकारी व पेंशनर्स उपस्थित झाले होते . परंतु माननिय प्रतापरावजी जाधव ( खासदार तथा केंदीय आयुष मंत्री ) महोदयांचे खास निर्देशांनुसार श्री. राजूभाऊ भोर (स्वीय सहाय्यक ) ह्यांनी बुलढाणा येथील eps 95 उपोषण मंडपात प्रत्यक्ष भेट देऊन पेन्शनर यांचे प्रश्नावर आवाज उठविणे साठी चे निवेदन स्वतः स्वीकारले व मा. मंत्री महोदय ,आपला प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले . आणि केव्हाही फोन केल्यास सहकार्य करण्याची हमी दिली.*
*सदर प्रसंगी श्री. सुधीर चांडगे (महाराष्ट्र सचिव) श्री पी एन मिरगे (जिल्हाध्यक्ष ) ,श्री.आर. बी. शेडगे, ( जिल्हाध्यक्ष)तसेच श्री. अशोक दाभाडे, बुलढाणा जिल्हा समन्वयक ) श्री ए के राऊत,( जिल्हा सहसचिव ) श्री निकम साहेब ह्या सर्वांनीच उपस्थितांना राष्ट्रीय संघर्ष समिती च्या चालू घडामोडी व आंदोलना बाबत सविस्तर मागदर्शन करुन आगामी दिल्ली आंदोलन यशस्वी करयासाठी बहुसंखेंने उपस्थित राहण्याचे आवाहन ही केले .श्री महाविरजी काळे ( तालुका सचिव), श्री साळोख '(तालुका सचिव) श्री नाना गरकल,(केंद्रीय सदस्य) श्री निकम ,श्री व्यवहारे,श्री जाधव श्री कुळकर्णी ,श्री तांबट, श्री आलेगांवकर,श्री खर्चे ,ह्यांचे सह शेकडो इ पी एस 95 पेन्शनर्स उपस्थित होते.*
0 Comments