Advertisement

भारताच्या पहिला महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा...

*भारताच्या पहिला महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा...*
जळगाव जामोद प्रतिनिधी-

विद्याभारती शैक्षणिक मंडळ अमरावती द्वारा संचालित सुनगाव येथील मातोश्री नथियाबाई विद्यालय व प्रायमरी इंग्लिश स्कूल येथे दिनांक १९ फेब्रुवारी रोजी भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई देवीसिंह शेखावत (पाटील) यांचा वाढदिवस विद्यालयात विविध उपक्रम घेऊन साजरा करण्यात आला. यामध्ये रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, तसेच भाषण स्पर्धा संपन्न झाल्या. यावेळी सर्वप्रथम भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून साजरा करण्यात आला. 




यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका घोटेकर मॅडम यांनी केले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक शिवदास सोळंके हे होते. यावेळी भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या जीवन चरित्रावर आणि त्यांचे सामाजिक राजकीय शैक्षणिक सांस्कृतिक योगदानाबद्दल विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक एस डब्ल्यू इंगळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी विद्यालयाचे शिक्षक आढाव सर, फोलाने सर, राजपुत मँडम, डिके सर, गवई मॅडम,उमेश पाटील सर,कुलट सर, लिपिक निखिल धुळे,एस व्ही राजपुत, रामेश्वर कुनगाडे, विशाल वसूलकार यांच्यासह विद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments