जळगाव जामोद प्रतिनिधी-
सुनगाव येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा व उर्दू प्राथमिक शाळेच्या वतीने महान कर्मयोगी, स्वच्छता प्रेरक, आपल्या कीर्तनातून लोकांच्या मनातील मळ दूर करणारे संत गाडगेबाबा यांचा २० डिसेंबर हा स्मृतिदिनानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा समिती अध्यक्ष किशोर धुळे सदस्य मीनाताई पाटील, ग्रामपंचायत सदस्य योगिताताई कुरवाडे, संतोष कापरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम कर्मयोगी गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्प माला अर्पण अध्यक्षांच्या व सदस्यांच्या तसेच मुख्याध्यापक रविंद्र राखोंडे सर व उर्दू शाळेचे मुख्याध्यापक शेख मजहर यांच्या हस्ते करण्यात आले. इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी संत गाडगेबाबा यांच्या जीवनावर आधारित कथा कविता इंग्रजीतून भाषण अभंग रचना इत्यादींच्या सादरीकरण उत्तमरीत्या केले. यावेळी शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका कु.अस्मिता क्षीरसागर मॅडम संत गाडगेबाबा यांच्या संपूर्ण जीवनावर सखोल असे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग सातवी व आठवीच्या कविता कापरे व आलिया तडवी यांनी उत्तमरीत्या केले. कुमारी ज्योती साबळे मॅडम यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. मराठी तथा उर्दू शाळेच्या वतीने कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषद शाळेचे खिरोडकार सर, वाकेकर सर, जाफर बेग सर, बोंबटकर मॅडम, गवई मॅडम, घुले मँडम, उमाळे मँडम, मनोहर वानखडे, राजु अंदुरकार यांच्यासह शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments