Advertisement

बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६८ रक्तदात्यांनी केले रक्तदान..!चंद्रभान झिने

बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६८ रक्तदात्यांनी केले रक्तदान..!

चंद्रभान झिने 

'चला रक्तदान करू नाही देणार रुग्णाला मरू'  हेच माणुसकी मंत्र जोपासत समाजसेवक तथा योद्धा ग्रुप चे अध्यक्ष आकाश कासारे मित्र मंडळ  च्या वतीने देऊळगाव राजा येथे  मागील अनेक वर्षापासून विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या जयंती दिनी व महापरिनिर्वाण दिनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते.
या-वर्षी सुद्धा आकाश कासारे यांच्या वतीने  रक्तदान शिबिराचे आयोजन ६ डिसेंबर २०२४ शुक्रवार  रोजी महापरिनिर्वाण दिनी करण्यात आले, यामध्ये एकूण ६८ रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजरुन फेडत महामानवाला खऱ्या  अर्थाने अभिवादन केले.
प्रसंगी घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा समोर मेणबत्ती प्रज्वलन करून कार्यक्रमाला 
युवा वर्ग ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग यांनी उपस्थित राहून सहकार्य केले.


आज त्या सूर्याचा महापरिनिर्वाण दिन आहे जो सूर्य मावळला पण लाखो घरांना पिढ्यान पिढ्या पुरेल येवढा प्रकाश देऊन गेला म्हणून आम्ही त्याची जाण ठेवत आपणही समाजाचं देणे लागतो,आपण ही समाजासाठी आपल्या परीने
काहीतरी करावं हीच भावना नेहमी मनात ठेवतो. या भावनेतून समाजहितासाठी मी व माझा मित्र परिवार नेहमी  सदैव कार्यरत राहणार.

Post a Comment

0 Comments