Advertisement

सुनगाव जिल्हा परिषद शाळेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन...*

*सुनगाव जिल्हा परिषद शाळेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन...*


दीक्षाभूमी ही बोले चैत्यभूमीला परतुनी देग माझा भीम तू मला.. ज्ञानाच्या अथांग सागरास विनम्र अभिवादन. 
आली कोटी कोटी गेले कोटी कोटी एक हिरा जन्मला माऊलीच्या पोटी...
भीमराव नावाच्या हिऱ्याने संपूर्ण विश्वाला ज्ञानाचा शांतीचा मार्ग दाखविला अशा महामानव युगपुरुष विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज दिनांक 6 डिसेंबर रोजी सुनगाव येथील जिल्हा परिषद तथा उर्दू प्राथमिक शाळे तर्फे महामानवाला अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र राखोंडे तसेच उर्दू शाळा मुख्याध्यापक मजहर शेख हे होते. त्यांच्या हस्ते महामानवाच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले उपस्थित सर्व शिक्षक व कर्मचारी वृंदा अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या हस्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे डॉक्टर आंबेडकरांच्या जीवनावर भाषण गीत गायनशीर इंग्रजी भाषण वेशभूषा इत्यादीचे सादरीकरण केले.कार्यक्रमात शाळेच्या शिक्षिका कु अस्मिता क्षिरसागर मँडम यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय विविध पैलूवर प्रकाश टाकला. 'महापरिनिर्वाणाचा 'सखोल अर्थ समजावून सांगितला.शिल्पा गवई मॅडम त्यांनी सुंदर गीतगायन केले.अध्यक्षीय भाषणातून मुख्याध्यापक रविंद्र राखोंडे सरांनी बाबासाहेबांच्या अनमोल विचारांवर प्रकाश टाकला.अंगणवाडी सेविका आरिफाबी, बेगसर, राखोंडे सर हयांनी अनुक्रमे 50,500,500 100 अशी एकूण 1150 रु. ची रोख बक्षिसे कार्यक्रमात सहभागी वि‌द्याथ्यर्थ्यांना दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग 8 ची कु. आलिया रहेमान तड़वी व वर्गची कुःकविता संतोष कापरे यांनी उत्तमरित्या केले. आभार प्रदर्शन कु. ज्योती साबे मॅडम यांनी केले.सर्व शिक्षक, विदयार्थी कर्मचारी अथक परिश्रमाने कार्यक्रमाची यशस्वी रित्या सांगता करून डॉ बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

Post a Comment

0 Comments