Advertisement

जिल्हा बँकेच्या माध्यमातून दिवसाढवळ्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर दरोडा भगवान बोराडे

*जिल्हा बँकेच्या माध्यमातून दिवसाढवळ्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर दरोडा !!!* 
      *भगवान बोराडे* 
     नांदगाव - नाशिक जिल्हा बँकेच्या 56 हजार कर्जदार शेतकऱ्यांचे संघटन बांधण्याची सुरुवात करुन 56 हजार शेतकऱ्यांच्या वतीने या बँकेच्या कारवाईच्या विरोधात मोठे जनआंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
     नाशिक जिल्हा बँकेच्या जमिनी जप्तीच्या विरोधात सुरु असलेल्या धरणे आंदोलनाचा आज 549 वा. दिवस असून सरकार या गोष्टीची दखल घेत नाही. म्हणून जिल्ह्यातील जिल्हा बँकेचे 56 हजार कर्जदार शेतकऱ्यांचे अधिकृत संघटन बांधण्याची सुरुवात 
  दिनांक 4 डिसेंबर 2024 रोजी धरणे आंदोलन स्थळावर कर्जदार शेतकऱ्यांची बैठक संपन्न झाली.
     या बैठकीत पुढील आंदोलनाची रणनीती ठरवण्यासाठी चर्चा झाली.
     कर्ज कराराच्या आधारे नाशिक जिल्हा बँक सरकार दरबारी कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी जप्त करुन विकास सोसायटीचे नावे लावल्या जात असल्याने नाशिक जिल्ह्यातील 56 हजार शेतकऱ्यांच्या कुटुंबातील शेतकऱ्यांचे मानसिक धैर्य खचले असून याला कायमस्वरुपी विलाज काढण्यासाठी मोठे जन आंदोलन करण्यात येणार असल्याचे समिती अध्यक्ष भगवान बोराडे यांनी आज बैठकीमध्ये सांगितले. नाशिक जिल्ह्यातील एक हजार शेतकऱ्यांच्या जमिनी शेतकऱ्याच्या उताऱ्यावरील शेतकऱ्याचे नाव हटवून बँकेने विकास सोसायटीचे नाव लावण्याचे बेकायदेशीर रित्या शेतकऱ्याच्या जमिनीवर दिवसाढवळ्या दरोडा टाकण्याचे षडयंत्र बँकेने सरकारच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून सुरु केले आहे.
 या विरोधात हे जनआंदोलन बांधण्याची सुरुवात केली आहे.  शेतकऱ्याचे नावे हटवलेले उतारे शेतकऱ्यांनी आंदोलन समितीकडे जमा केले असून येत्या ९ डिसेंबर 2024 रोजी हे उतारे न्यायालयात हजर करणार असल्याचे भगवान बोराडे यांनी सांगितले ! 
      या बैठकीस सर्वस्वी भगवान बोराडे, दिलीप पाटील, कैलास बोरसे, नाठे सर, अनंत पाटील, खंडेराव पाटील, नथू उदार, लक्ष्मण निवृत्ती बोगीर, राजू भवर, संतोष भोई, भास्कर भामरे, आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments