Advertisement

सुनगांव येथील मातोश्री नथियाबाई विद्यालयात महामानवास अभिवादन कार्यक्रम संपन्न.

सुनगांव येथील मातोश्री नथियाबाई विद्यालयात महामानवास अभिवादन कार्यक्रम संपन्न...
जळगाव जामोद प्रतिनिधी- 
जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील मातोश्री नथियाबाई विद्यालयात दिनांक ६ डिसेंबर रोजी विश्वरत्न महामानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला... यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मातोश्री नथियाबाई विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय इंगळे हे होते.यावेळी जेष्ठ शिक्षक शिवदास सोळंके,जेष्ठ शिक्षिका घोटेकर मँडम, पत्रकार शिवदास सोनोने, पत्रकार अनिल भगत,शिक्षक इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.सर्वप्रथम मुख्याध्यापक संजय इंगळे यांच्यासह मान्यवरांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन या विद्यार्थ्यांनीने केले.यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनीनी व विद्यार्थी यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित भाषणे दिली.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ह्या विद्यार्थ्यांनीने केले.यावेळी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात मुख्याध्यापक संजय इंगळे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या असामान्य कामांचा पाढाच तसेच त्यांनी केलेल्या सत्याग्रहांचे महत्त्व याविषयी माहिती विद्यार्थ्यांनसमोर कथन केली.यावेळी खुशी जवंजाळ या विद्यार्थ्यांनींने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनाचा प्रवास कथन केला यासह वर्ग ५ ते ९ च्या विद्यार्थ्यांनी धडाकेबाज भाषणे दिली.. यावेळी कार्यक्रमाला शाळेचे शिक्षक आढाव सर,फोलाने सर, राजपुत मँडम,डिके सर, गवई मँडम,उमेश पाटील,कुलट सर, लिपिक निखिल धुळे,एस व्ही राजपुत, रामेश्वर कुनगाडे, विशाल वसुलकार यांच्यासह विद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते...

Post a Comment

0 Comments