Advertisement

महात्मा फुले यांची मुलींची शाळा ही शैक्षणिक व सामाजिक क्रांती प्रा भाऊसाहेब इंगळे

महात्मा फुले यांची मुलींची शाळा ही शैक्षणिक व सामाजिक क्रांती 
 प्रा भाऊसाहेब इंगळे

जानेवारी 1848 रोजी पुण्यातील भिडे वाड्यात महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी सामाजिक प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने कार्य करून मुलींची पहिली शाळा सुरू करून शैक्षणिक व सामाजिक क्रांती केली त्यांच्या या कार्यामुळेच आज स्त्रिया राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचल्या व सामाजिक सुधारणा होऊन देश महासत्ता बनू पाहत आहे असे प्रतिपादन प्राध्यापक भाऊसाहेब इंगळे यांनी केले 


स्थानिक एकता नगर मधील राजाभाऊ कोकाटे यांच्या निवासस्थानी फुले दांपत्याने सुरू केलेल्या मुलीच्या शाळेचा 177 वा वर्धापन दिन दिनांक एक जानेवारी 2025 रोजी साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष आर टी वाकेकर प्रमुख मान्यवर डॉ एस एन भोपळे डॉ संदीप वाकेकर डॉ स्वातीताई वाकेकर वत्सला भारस्कर हुसैन डायमंड रुक्मिणी तायडे सुमन शेगोकार आदींनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुष्प दीप व धुपाने पूजन करून पुष्प मालाअर्पण केल्यात याप्रसंगी डॉ स्वातीताई वाकेकर व डॉ एस एन भोपळे यांनी आधी मान्यवरांनी विचार व्यक्त केले सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ उज्वला कोकाटे यांनी केले तर आभार संतोष तायडे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स शिला चराटे मिनल तायडे विनीत कोकाटे नितीन तायडे रेखा तायडे हिरकणी बडगे कोमल बडगे आदींनी परिश्रम घेतले व भोजन दाना नंतर कार्यक्रमाची सांगता झाली या प्रसंगी महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती

Post a Comment

0 Comments