अध्यादेशाप्रमाणे नेताजी जयंती पराक्रम दिवस साजरा करणे बंधनकारक.
लोकउपयोगी उपक्रमातून वर्षभर नेताजींना मानवंदना देणार.
देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस सार्वजनिक जयंती उत्सव समितीची स्थापना.
बुलढाणा:
23 जानेवारी देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरी करण्यासाठी जिल्हास्तरीय देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती उत्सव समितीची स्थापना.वर्षभर विविध सामाजिक लोकउपयोगी कार्यक्रमांचे भरगच्च आयोजन.
नेताजी जयंती पराक्रम दिवस लोकउपयोगी उपक्रम कार्यक्रमातून साजरा करण्यासाठी 20 जानेवारीला सायंकाळी बुलढाणा शहरातील राऊत कॉम्प्लेक्स येथे समितीची स्थापना करून पुढील एक वर्षभराच्या कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र ससाने यांच्या अध्यक्षतेत नियोजन बैठक संपन्न झाली. यावेळी अँड सतीशचंद्र रोठे पाटील, संजय येडोले, सुरेखाताई निकाळजे, शेख सईद, पंचफुला गवई, सिंधुताई अहेर,सय्यद युसुफ, गुणवंत पाटील, शेख कदीर, आशाताई गायकवाड, योगेश कोकाटे, शेख अफसर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सदर नियोजन बैठकीमध्ये विविध लोकउपयोगी उपक्रमांचा समावेश असून त्यामध्ये सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम, विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा,स्मारकांची रंगरंगोटी, अनाथांना मदत, वृक्षारोपण, अन्नदान, शालेय साहित्य वाटप,व्यक्तिमत्व विकास शिबिर, सफाई अभियान,रक्तदान शिबिर आरोग्य शिबिरांचे वर्षभर आयोजन करण्यात येणार आहे. तर केंद्र सरकारच्या अध्यादेशाप्रमाणे पराक्रम दिवस राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून शासकीय,निमशासकीय कार्यालय, शाळा,महाविद्यालय,संस्था यांना नेताजींना लोकउपयोगी उपक्रमातून 23 जानेवारी ते 26 जानेवारी 2025 दरम्यान अभिवादन करणे बंधनकारक आहे.
तर ज्या शासकीय निमशासकीय कार्यालय, संस्था,महाविद्यालयांमध्ये पराक्रम दिवस राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून नेताजींना अभिवादन केल्या जाणार नाही.त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यासाठी देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस सार्वजनिक जयंती उत्सव समिती पुढाकार घेईल. यासह विविध ठराव सर्वानुमते यावेळी पारित करण्यात आले.
स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग प्रज्वलित करणाऱ्या महानायकाला प्रत्येक राष्ट्रभक्त नागरिकाने पराक्रम दिवस जयंतीदिनी अभिवादन करावे. असे आवाहन समितीच्या वतीने भाई गजेंद्र आवारे, श्रीकृष्ण भगत, रामचंद्र झोरे, गजानन झांबरे, श्रीकृष्ण कोकाटे, शेख रसूल, प्रमिलाबाई सुशीर, गणेश राऊत, मोहन सोळंके, संजय चावला, उमेश कायस्थ, यांनी केले आहे.
------------
0 Comments