Advertisement

खंडणी मागणाऱ्या चौघांना अटकव्यापाऱ्याची केली सुटका; दसरखेड एमआयडीसी पोलिसांची कारवाई

खंडणी मागणाऱ्या चौघांना अटकव्यापाऱ्याची केली सुटका; दसरखेड एमआयडीसी पोलिसांची कारवाई

खंडणी मागणाऱ्या चौघांना अटकव्यापाऱ्याची केली सुटका; दसरखेड एमआयडीसी पोलिसांची कारवाई


मलकापूर, स्क्रॅपींगच्या व्यवहारासाठी दसरखेड एमआयडीसी येथे आलेल्या गुजरातच्या व्यापाऱ्याचे अपहरण करीत ५० लाखांची खंडणी मागणाऱ्या चार आरोपींना दसरखेड (मलकापूर) एमआयडीसी पोलिसांनी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातून अटक करीत अपहरण झालेल्या व्यापाऱ्याची सुटका केली.याबबतची अधिक माहिती अशी की, ता. २२ जानेवारी रोजी एमआयडीसी (मलकापूर) पोलीस स्टेशन येथे दुपारी ४.३० वा. चे सुमारास आसिफ अलीभाई सर्वदी (३१) रा. कंकारा, ता. कंकारा, जि. मोरबी (गुजरात) याने माहिती दिली की, २० जानेवारी रोजी तो त्याचे वडील नामे अली भाई अकबर भाई (५२) यांच्यासोबत अनंत कृपा पेपर मील दसरखेड एमआयडीसी मलकापूर येथे स्क्रैपींगच्या व्यवहारासाठी आले होते. दरम्यान एका पांढऱ्या रंगाच्या क्रेटाकार मधून ४ इसम त्याच्या वडीलांजवळ आले व त्यांना जबरदस्तीने त्यांच्यासोबत कारमध्ये बसवून घेवून गेले. काही वेळाने त्यांना त्याच्या वडीलांच्या फोनवरून फोन आला व त्यावरून अज्ञात इसमांनीत्यांच्या देवाण-घेवाण व्यवहाराचे ५० लाख रू. आणुन द्या त्यानंतरच तुमच्या वडीलांना सोडतो असे सांगितले.या माहितीच्या आधारे पोलिसांनी अली भाई अकबर भाई याचा मो. क्र. ८४६९४५९९१७ चे लोकेशन सर्च केले असता अंधारी ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद येथील दिसले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने पथक तयार करून सिल्लोड ग्रामीण पो.स्टे. च्या हद्दीत जावून तेथील स्थानिक पोलीसांची मदत घेवून अलीभाई अकबरभाई सर्वदी यांचा अंधारी ता. सिल्लोड जि. छ. संभाजीनगर परिसरात शोध घेतला असता शेख मुश्ताक शेख इलियास (३३), अनिस युसुफ पटेल (४६), हक्कानी जिलानी पटेल (३८), शेख शाहीद शेख सईद (३२) सर्व रा. अंधारी ता. सिल्लोड जि. छ. संभाजीनगर यांच्या ताब्यात मिळून आले. पोलिसांनी अपहरण झालेले अली भाई अकबर भाई यांची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका करीत उपरोक्त चारही आरोपींना ताब्यात घेत पुढील कारवाईसाठी दसरखेड एमआयडीसी पो.स्टे.ला आणले. याप्रकरणी आसिफभाई अलीभाई सरवदी याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

0 Comments