*व्हॉइस ऑफ मीडियाच्या तालुका अध्यक्षपदी राजीव वाढे तर इलेक्ट्रॉनिक विगच्या तालुकाध्यक्षपदी संपादक राजेश बाठे...*
जळगाव जामोद प्रतिनिधी...
स्वातंत्र्यदिनी दिनांक २६ जानेवारी रोजी स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात व्हॉइस ऑफ मिडिया संघटनेची तालुका बैठक संपन्न झाली. यावेळी नवनिर्वांचित जिल्हाध्यक्ष कृष्णा सपकाळ अध्यक्षपदावरून बोलताना म्हणाले व्हॉईस ऑफ मीडिया संघटना ही देशातील १३१वी संघटना आहे. ह्यापूर्वी एवढ्या संघटना अस्तित्वात असताना आपल्याला नवीन संघटना का निर्माण करावी तसेच व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेच्या लढ्यामुळे पत्रकारांसाठी आर्थिक विकास महामंडळ सुद्धा निर्माण झाले. पत्रकारांच्या निवृत्ती वेतन वाढीचा मुद्दा सुद्धा शासनाने निकाली काढला. काही ठिकाणी पत्रकारांसाठी घरे निर्माण करणे सुद्धा सुरू झाले आहे.अध्यक्षपदावरून बोलत होते. राज्य कार्यवाह लक्ष्मीकांत बगाडे, जिल्हा कार्याध्यक्ष गुलाबराव इंगळे,ज्येष्ठ पत्रकार भाऊ भोजने, जिल्हा संघटक काशिनाथ मानकर, सुनील तिजारे, साबीर अली, निलेश राऊत, शौकत भाई यांची सुद्धा व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थिती होती.एमसीएन न्युजचे संपादक राजीव वाढे यांची तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा जिल्हाध्यक्ष सपकाळ यांनी केली,त्याचबरोबर साप्ताहिक विंग तालुका अध्यक्ष म्हणून जळगाव उन्नतीचे संपादक शमीम देशमुख, जिल्हा सह. कोषाध्यक्ष म्हणून लोकमतचे जयदेव वानखडे, इलेक्ट्रॉनिक विंगचे तालुकाध्यक्ष म्हणून आर.सी.२४ न्युज चॅनलचे राजेश बाठे यांच्या नावाची सुद्धा घोषणा जिल्हाध्यक्ष कृष्णा सपकाळ यांनी ह्यावेळी केली.प्रास्ताविक जिल्हा कार्याध्यक्ष गुलाबराव इंगळे यांनी केले.
नवनिर्वाचित तालुका अध्यक्षअध्यक्ष राजीव वाढे यांनी कार्याध्यक्ष म्हणून गणेश भड, सचिव विनोद वानखडे. तालुका संघटक राजकुमार भड, कोषाध्यक्ष सागर झनके , कार्यवाह मोहम्मद फारुख ,उपाध्यक्ष संजय दांडगे ,उपाध्यक्ष गणेश गिर्हे ,सहसचिव गजानन खिरोडकार, सहसचिव मंगल काकडे, सदस्य डॉ.राजेन्द्र तानकर गजानन सोनटक्के, गोपाळ अवचार धानोरा,राहुल निर्मळ आदींचा तालुका कार्यकारणी जाहीर केली..कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संग्रामपूर तालुकाध्यक्ष नारायण सावतकार,संजय दांडगे, अनिल भगत, गजानन सोनटक्के, रवी शिरस्कार, आकाश उमाळे, सागर झनके, गोपाळ अवचार यांनी अथक परिश्रम घेतले.
0 Comments