उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पालकमंत्र्यांच्या हस्ते ठाणेदार श्रीकांत निचळ सन्मानित…
जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीकांत निचळ यांचा २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी बुलढाण्याचे पालकमंत्री तथा मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक जिच्या पार्श्वभूमीवर जळगांव जामोद पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ग्राम भिंगारा येथील गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून ४५०५ किलो गांजा (अमली पदार्थ) ज्याची किंमत अंदाजे ४ कोटी ५१ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून आरोपीस जेरबंद केले होते. पोलीस स्टेशन जळगाव जामोद येथे अप नंबर ६२७/२०२४ कलम २० NPDS Act प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. या कारवाईदरम्यान ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या पथकाला
अक्षरशा एक ते दीड एकर शेतामधील सहा ते सात फूट उंच असलेल्या गांजाच्या झाडांना उपटून त्याच्या पेंड्या बांधून दरी मधून जवळपास २०० मीटर उंच अशा शेतामध्ये नेऊन तेथून ट्रॅक्टर द्वारे पोलीस स्टेशनला नेऊन टाकणे एवढे कठीण परिश्रम घेऊन आरोपीस अटक करून ही कारवाई त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली होती. जळगाव जामोद ठाणेदार श्रीकांत निचळ व टीम यांनी ही कौतुकास्पद कामगिरी केली होती.त्याचाच आज प्रजासत्ताक दिन पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला…
0 Comments