Advertisement

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त सुनगांव जिल्हा परिषद शाळेची जनजागृती रँली संपन्न...

*राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त सुनगांव जिल्हा परिषद शाळेची जनजागृती रँली संपन्न...*
जळगाव जामोद प्रतिनिधी...

जळगाव जामोद तालुक्यातील उपक्रमशील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा व उर्दू प्राथमिक शाळेच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त दिनांक २५ जानेवारी रोजी सुनगांव गावामध्ये मुख्याध्यापक रवींद्र राखोंडे सर व उर्दू शाळा मुख्याध्यापक मजहर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली.यावेळी गावातील मुख्य चौकात गावातील नागरिक विद्यार्थी शिक्षक पत्रकार यांच्या उपस्थितीत मतदार दिनी शपथ घेण्यात आली.यावेळी शिक्षक बेग यांनी उपस्थित सर्व नागरिक व विद्यार्थ्यांना सविस्तर असे मार्गदर्शन केले.यावेळी विद्यार्थ्यांनी मतदार दिनानिमित्त दिलेल्या घोषवाक्यांच्या नाऱ्यांनी सर्व परिसर दणाणून सोडला होता.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र राखोंडे, मुख्याध्यापक मजहर शेख,बेग सर, प्रदीप वाकेकर सर,खिरोडकार सर,अंबडकार सर, अस्मिता क्षिरसागर, साबे मॅडम, बोंबटकार मॅडम, गवई मॅडम, उमाळे मॅडम, कर्मचारी मनोहर वानखडे राजु अंदुरकार यांच्यासह गावातील नागरिक महादेव मिसाळ, काशिराम कपले,विनोददादा इंगळे, मुरलीधर उमाळे रामकृष्ण धर्मे,अक्षय भड, लक्ष्मण बोबडे, विजय बावस्कर, पप्पू कळमकार, विश्वनाथ हागे, दिपक ढगे, राहुल वानखडे यांच्यासह शाळेतील विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती...

Post a Comment

0 Comments