सुनगाव येथे शेतकरी आयडी कार्डचे शिबिर संपन्न तहसीलदार यांची प्रमुख उपस्थिती
जळगाव जामोद दि 26-आज दिनांक 26 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता सुनगाव ग्रामपंचायत येथे शेतकरी आयडी कार्ड विषयी विशेष शिबिर संपन्न झाले यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जळगाव तहसीलचे तहसीलदार पवन पाटील यांची तसेच नायब तहसीलदार मार्कंड यांची उपस्थिती लाभली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायतचे सरपंच रामेश्वर आंबेडकर हे होते.
यावेळी बोलताना तहसीलदार पवन पाटील म्हणाले की शेतकरी आयडी कार्ड मुळे शेतकऱ्यांची डिजिटल ओळख निर्माण होईल, शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती शेतकरी आयडी मध्ये एकत्रित केले जाईल यामुळे कोणत्याही शेती विषयक योजनेच्या फॉर्म भरणे शेतकऱ्यांना सुलभ होईल तसेच भविष्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी हे कार्ड उपयुक्त ठरेल तसेच शेतकरी आयडी कार्ड मध्ये माहिती एकत्र असल्यामुळे कागदपत्रे सोबत ठेवण्याची आवश्यकता भासणार नाही. तसेच नायब तहसीलदार मार्कंड यांनी सुद्धा फार्मर आयडी कार्डचे महत्व उपस्थित नागरिकांना सांगितले व शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी कार्ड किती महत्त्वाचे आहे याचे महत्त्व विशद केले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सुनगाव तलाठी जी डी वाघ यांनी केले. या कार्यक्रमाला मंडल अधिकारी व्ही एस शिंदे, तलाठी चवरे,महादेवराव धूर्डे, शालिग्राम भगत, कृषी मित्र मोहन सिंग राजपूत ,पत्रकार गणेश भड ,सीएससी चालक सुनील भगत, अर्जुन ढगे, भिकाजी नानकदे, ग्रामपंचायत कर्मचारी , महसूल कर्मचारी तुकाराम ढोले, व गावातील नागरिकांची उपस्थिती होती.
सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन तलाठी चवरे यांनी केले.
0 Comments