Advertisement

एस टी भाडेवाढ विरोधात बुलडाणा येथे शिवसेनेचा(उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वात चक्का जाम आंदोलन.

*एस टी भाडेवाढ विरोधात बुलडाणा येथे शिवसेनेचा(उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वात चक्का जाम आंदोलन.* 
       
अमिन शेख सहसंम्पादक 

बुलडाणा,गोरगरिबांना प्रवासात साथ देणारी लालपरी म्हणजेच एस टी च्या भाडेवाढीचा निर्णय सरकारने घेतला. एस टी महामंडळाने १५% दरवाढ केली. या दरवाढी विरोधात आज दिनांक २८/१/२०२५ रोजी बुलडाणा जिल्हा शिवसेनेतर्फे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संगम चौक व एस टी डेपो बुलडाणा येथे *श्री जालिंदर बुधवत जिल्हा प्रमुख बुलडाणा* यांच्या नेतृत्वात निदर्शने करून आंदोलन करण्यात आले. झालेली दरवाढ ही सामान्य जनतेवर केलेला अन्याय असून या  दरवाढीचा निर्णय मागे घ्यावा अन्यथा येणाऱ्या काळात शिवसेनेतर्फे जिल्ह्यात मोठ्या स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
    यावेळी जिल्हा संघटक प्रा डी एस लहाने सर, ॲड. सुमित सरदार, उप जिल्हा प्रमुख सुनील घाटे, तालुका प्रमुख लखन गाडेकर, विजय इंगळे, युवासेना जिल्हा प्रमुख नंदु कऱ्हाडे, उप जिल्हा प्रमुख डॉ अरुण पोफळे, किसान सेनेचे उप जिल्हा प्रमुख अशोक गव्हाणे, गणेश सोनूने, की से तालुका प्रमुख गजानन उबरहंडे, दलीत आघाडीचे बबन खरे, उप तालुका प्रमुख विजय इतवारे, एकनाथ कोरडे, किशोर कानडजे, मोहम्मद सोफियान, राजु बोरसे, अनिकेत गवळी,  माजी सभापती सुधाकर आघाव, समाधान बुधवत, रवी गोरे, राहुल जाधव, शाम सावळे,  संजय गवळी, रामेश्वर बुधवत, शेख मुज्जमीर, रहेमान कुरेशी, शेषराव सावळे, भीमराव लवंगे, सुभाष आराख, विठ्ठल गायकवाड, सागर हिवाळे, विकास निर्मले, नरेश खरे, भानुदास जगताप, किरण पाटील, दिपक पाटील, दिनकर पांडे, संदीप जाधव, निलेश गाडेकर, लोखंडे, राहुल बाजारे, श्रीकांत जाधव, अनिल पडोळकर, संदीप सावळे, सतीश राजपुत, उदय देशमुख, बाळू शेळके, विनोद तायडे, दिंगबर दळवी प्रवीण वाघ, शाम खडके, वसंता सावळे, शेषराव सावळे, मधुकर महाले, मुकुंदा काळे, यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments