Advertisement

मातोश्री नथीयाबाई विद्यालयात बाल आनंद मेळावा संपन्न.

मातोश्री नथीयाबाई विद्यालयात बाल आनंद मेळावा संपन्न.
ग्राम सुनगाव येथल मातोश्री नथीयाबाई विद्यालयात  दिनांक 28 जानेवारी रोजी बाला आनंद मेळाव्याचे आयोजन शाळेचे आवारात मोठ्या उत्स्फूर्त वातावरणात संपूर्ण झाले. विद्यार्थ्यांनी सकाळपासूनच आपल्या खाद्यपदार्थांचे वेगवेगळे स्टॉल शाळेच्या परिसरात लावले होते. यामध्ये पापड, मटकी, चवळी उसळ, इडली, पोहे, कुरकुरे, पाणीपुरी, बर्फी, चणे उसळ, मिसळ, सोनपापडी यासारखे बरेच खाद्यपदार्थ विक्रीस आणले होते. बाल आनंद मेळाव्याच्या उद्घाटनासाठी शाळाविद्यालयाचे मुख्याध्यापक संजय इंगळे सहाय्यक शिक्षक एस डब्ल्यू इंगळे  विद्यालयातील शिक्षक फोलाने सर, राजपुत मँडम, डिके सर, अतुल पाटील सर, गवई मॅडम, उमेश पाटील सर,कुलट सर, लिपिक निखिल धुळे, एस व्ही राजपुत, रामेश्वर कुनगाडे, विशाल वसूलकार यांच्यासह विद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments