Advertisement

मातोश्री नथियाबाई विद्यालयात निरोप समारंभ संपन्न...

*मातोश्री नथियाबाई विद्यालयात निरोप समारंभ संपन्न...*
जळगाव जामोद प्रतिनिधी...

सुनगांव येथील मातोश्री नथियाबाई विद्यालयात दिनांक ११ फेब्रुवारी रोजी वर्ग दहाव्या विद्यार्थ्यांकरिता निरोप समारंभाचे आयोजन वर्ग ९ वीच्या विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याध्यापक शिवदास सोळंके तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा समितीचे बळीराम वंडाळे, विनोद अंदुरकार, अमोल चवटकार, पत्रकार राजकुमार भड, शिवदास सोनोने, गजानन सोनटक्के, अनिल भगत, सहाय्यक शिक्षक एस डब्लू इंगळे,गायकी सर यांची उपस्थिती होती.


कार्यक्रमाची सुरुवात माँ सरस्वती,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून करण्यात आली.त्यानंतर वर्ग १० च्या विद्यार्थ्यांनी आप-आपली मनोगत व्यक्त करून शाळेतील आपल्या आठवणींना उजाळा दिला.यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात विद्यालयातील शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत शिक्षकांनी केलेले मार्गदर्शन आणि प्रेमळ स्वभावाचा यावेळी उल्लेख केला


.यावेळी विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक शिवदास सोळंके यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की जिवनात काहितरी करायचे असेल तर मनात जिद्द आणि चिकाटी असायला पाहिजे.त्यामुळेच तुम्ही सर्व विद्यार्थी आयुष्यात मागे न राहता पुढे च जाल, तसेच यावेळी एस डब्लु इंगळे यांनी आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन वर्ग ९ ची विद्यार्थिनी श्रृती मानकर तर आभार दिव्या कतोरे हिने केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाच्या शिक्षिका घोटेकर मँडम,राजपूत मँडम,उमेश पाटील ,शुभम कुलट, डिके सर ,अतुल पाटील, तेजस  बोंबटकार ,राजपूत मॅडम उमाळे मॅडम, गवई मॅडम, निखिल धुळे, विशाल वसूलकार ,सुवर्णसिंग राजपूत, रामेश्वर  कुनगाडे  तसेच मातोश्री नथियाबाई इंग्लिश कॉन्व्हेंट च्य शिक्षिका कुमारी धुळे मँडम, राजपूत मँडम यांच्यासह वर्ग नववीच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments