वडशिंगी येथील जिल्हा परिषद हायस्कूल येथे 11 फेब्रुवारी रोजी वर्ग 10 वीच्या विद्यार्थ्याकरिता निरोप समारंभाचे आयोजन वर्ग 9 च्या विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री विजय इंगळे सर हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली त्यानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपापली मनोगत व्यक्त करून शाळेतील आपल्या आठवणींना उजाळा दिला. त्यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगत आहेत विद्यालयातील शिक्षकाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत शिक्षकांनी केलेले मार्गदर्शन आणि प्रेमळ स्वभावाच्या यावेळी उल्लेख केला.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय इंगळे सर यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की जीवनात काहीतरी करायचे असेल तर मनात जिद्द आणि चिकाटी असायला पाहिजे. त्यामुळेच तुम्ही सर्व विद्यार्थी आयुष्यात मांगे न राहता पुढेच जाल तसेच यावेळी श्री जी ई केदार सर श्री एस एच दाते सर सौ बगाडे मॅडम श्री एस पी जाधव सर सौ देवचे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग 9 तील विद्यार्थिनी कु.गौरी वाघ व कु.पुनम माहोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन कु . गौरी हीरोडकार हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे शिक्षक श्री पी ए राऊत सर श्री एन एच पुंडे सर सौ उमरकर मॅडम सौ वानखडे मॅडम तसेच रोशन पवार व सचिन बोंबटकार यांच्यासह वर्ग 9 विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
0 Comments