सुनगांवचे ग्राम दैवत श्री सिध्द आवजिसीध्द महाराजांचा भंडारा महोत्सव येत्या १८ फेब्रुवारी ला दरवर्षी प्रमाणे येत आहे...
श्री आवजिसिध्द महाराजांचा महोत्सव म्हणजे संपूर्ण परीसरात पर्वणीच असते काय जल्लोष काय ती मंदिराची सजावट संपूर्ण सुनगांव नगरीत प्रत्येक घराची साफसफाई रंगरंगोटी करुन सर्व काही सुशोभित करण्यात येते.संपूर्ण गावात घरोघरी पै पाहुण्यांची वर्दळ होते.महाराजांचा महोत्सव म्हणजे माघ पौर्णिमेच्या दिवशी मंदिरात नारळ फोडुन सुरू होणारा महोत्सव सात दिवस पुजा अर्चा व भंडाऱ्याची तयारी करण्यात संपूर्ण गाव आपआपल्या परीने सहभाग नाेंदवत असतो यात भंडाऱ्याच्या अगोदरच्या दिवशी सुळीचे बैलगाडे सातपुडा पर्वतात जाऊन स्वयंपाकासाठी लाकुड जमा करुन आणले जाते ...
राञी काही भाविक महाराजांच्या अभिषेकसाठी तिर्थ आणायला पुर्णा नदीवर,जामोद येथील बेंबळेश्वर मंदिरात,सातपुडा पर्वतातील बालगोविंद महाराजांच्या मंदिरात,मैलगडावर व गोरक्षनाथ मंदिर अशा ठिकाणावरून पवित्र पाणी आणुन सकाळी महाराजांचा अभिषेक केला जातो.सकाळी ९.०० वाजता भंडाऱ्याची गावातुन वाजत गाजत मिरवणूक निघते यात मोठ्या प्रमाणात बैलगाडे, ट्रक्टर, तसेच आपल्या मालकीचे वाहने घेऊन भाविक सहभागी होतात या वाहनामध्ये भंडाऱ्यासाठी लागणारी सामुग्री जसे ज्वारीचे पिठ,दाळ,मिठ मिरच्या, केळीची पाने,भांडीकुंडी घेऊन मिरवणूक मंदिरात आल्यावर साधारण ११ वाजता पासुन स्वयंपाकासाठी सुरवात होते दिवस भर महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ लागलेली असते महीला मंडळी मंदिराच्या परीसरात महाप्रसादासाठी भाकरी बनवितात लाखाच्या वर लोकांना पुरेल येवढा स्वयंपाक अवघ्या काही तासात तयार केला जातो. संध्याकाळी सात वाजेपासून महापंगतीला सुरवात केली जाते.यामध्ये लाखो महीला पुरूष महाप्रसादाचा लाभ घेतात...
राञभर मंदिरामध्ये भजन कीर्तन होऊन प्रांतकाळी महाराज ढवळ्यागिरीच्या याञेसाठी मार्गस्थ होतात...
दुसऱ्या दिवशी भंडाऱ्याची भांडी कुंडी साफसफाई करुन भंडाऱ्याची वाजत गाजत मिरवणूक मंदिरातून गावात परत येते....
अशा प्रकारे संपूर्ण गावाच्या सहकार्याने दरवर्षी श्री. सिध्द आवजिसीध्द महाराजांचा महोत्सव आमच्या सुनगांव ता.जळगांव जामोद जि.बुलढाणा येथे आयोजित होतो...
बघा जमलं तर आपन पन सहभागी व्हा येणाऱ्या १८ फेब्रुवारी ला महाराजांच्या या महोत्सवात!
0 Comments