जामोद येथील सोन्याचा गिन्न्या प्रकरणी दोन आरोपी मुद्देमालासह अटक,
नगदी दोन लाख रुपये व दोन मोबाईल जप्त,!!
जळगाव जा तालुक्यासह व परिसरात मोठे रॅकेट सक्रिय असून पोलीस रॅकेटचा भांडाफोड ,!!
बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यात नकली सोने, काळी हळद, पांढरे बिबे ,मांडूळ साप सचं बोलो सच तोलो कलदर,कोईन नगमनी भोपळे,व इतर वस्तूची कमी पैशात मिळत असल्याची दलाला कडून बतावणी करून बाहेर जिल्ह्यातील लोकांची फसवणूक करून मारहाण करत लाखो रुपये उकळल्याचा प्रकार कित्तेक वर्षापासून पासून परिसरात सुरू आहे,जळगाव जा संग्रामपूर तालुक्यात मोठे रॅकेट सक्रिय असून मोठ्या प्रमाणात दलाल सक्रिय असून यांच्या विरोधात आज पर्यंत कारवाई झाली नव्हती परंतु प्रकरणी जळगाव जा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला,घटना दिनाक 18/2/2025 रोजी जामोद चौकी चे हद्दीत दोघांना सोन्याच्या गींन्या कमी पैशात मिळत असल्याची ची बतावणी करून दोन लाख रुपयाची फसवणूक बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जा तालुक्यातील ग्राम जामोद येथे घडली असून घटनेची नोंद दिनाक 19/2/2025 रोजी जळगाव जामोद पोलीस स्टेशन येथे फिर्याद घेण्यात आली घटना ,दिनाक 18/2/2025 रोजी जामोद येथील आरोपी भारत भोसले व इतर दोन आरोपींना नगदी दोन लाख रुपये व दोन मोबाईल या मुद्देलासह अटक करण्यात आली घटनेचा कर्तव्य दक्ष अधिकारी यांनी तत्काळ तपास करीत आरोपी जेरबंद केले जळगाव जा पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्रीकांत नीचड यांचे मार्गद्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश मोहोळ करीत रॅकेट च भांडाफोड करण्यात आला तसेच जनतेने प्रलोभनाला व आमिषाला बळी पडू नका,आमिषाला बळी पडल्यास तत्काळ पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करावी असे आवाहनठाणेदार श्रीकांत नीचड यांचे वतीने करण्यात आले,
0 Comments