: स्वाभिमानीच्या प्रशांत डिक्करांना खंडणी प्रकरणी अटक...
जिगाव प्रकल्पातून जास्तीचा मोबदला मिळवून देण्यासाठी घेतली खंडणी...
शेतकऱ्यांकडून प्रशांत डिक्कराला लोटपाट..
डिक्करला पोलिसांनी घेतले ताब्यात
स्वाभिमानी शेतकरी संघटने च्या युवा आघाडीचे विदर्भ प्रमुख प्रशांत डीक्कर यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी खंडणी घेतल्याचा आरोप केलेला असून आज बुलढाणा जिल्ह्यातील शेगावातील जिगाव कार्यालयात प्रशांत डिक्कर ला शेतकऱ्यांकडून लोटपाट झालेली असून पोलिसांनी शेतकऱ्यांच्या तक्रारी वरून खंडणी प्रकरणात डिक्कर यांना अटक केली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या जिगाव या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात गावठाण क्षेत्राकरिता शासनाने शेतकऱ्यांच्या शेती भूसंपादित केलेली असून त्यासाठी मोबदला शेतकऱ्यांना दिला जात आहे. मात्र हा मोबदला प्रति हेक्टर 40 लाख रुपये मिळवून देतो असे आमिष दाखवून शेतकऱ्यांकडून लाखो रुपये उकळल्याचा आरोप करीत आणखीन पैशासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीतील विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर हे त्रास देत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी करीत आज शेगाव येथील जिगाव प्रकल्पाच्या कार्यालयात शेतकरी व अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये प्रशांत डीक्कर यांना शेतकऱ्यांनी लोटपाट करीत बैठकीतून हाकलून लावण्याचा प्रकार समोर आलेला आहे. व खोटे बोलून आमचे घेतलेले पाच लाख परत द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी डिक्कर यांचेकडे केली.डिक्कर यांनी पैसे परत द्यायला नकार दिल्यानंतर शेतकऱ्यांनी डिक्कर यांना मारहानीचा प्रयत्न केला. यावेळी डिक्कर यांचे कार्यकर्ते पळून गेले.याच घटनेची माहिती मिळताच शेगाव पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर प्रशांत डिक्कर यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले. यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने संग्रामपूर तालुक्यातील हिंगणा कवठळ या गावाच्या सरपंचा पुष्पा संदीप मोरखडे यांनी रीतसर शहर पोलिसात तक्रार नोंदविली यावरून प्रशांत डिक्कर यांच्या विरोधात खंडणीसह विविध कलमान्वये गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
0 Comments