Advertisement

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना श्री अंबादासजी दानवे साहेब यांनी घेतली स्व. कैलास नागरे यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना श्री अंबादासजी दानवे साहेब यांनी घेतली स्व. कैलास नागरे यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट.

    बुलडाण जिल्हा देऊळगाव राजा तालुक्यातील शिवणी आरमाळ या गावातील पुरस्कार प्राप्त युवा शेतकरी *स्व. कैलास अर्जुनराव नागरे* यांनी दि. १३ मार्च २०२५ रोजी होळीच्या दिवशीच शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. खडकपूर्णा या धरणातून शेतकऱ्यांना पाणी मिळावे या मागणीसाठी त्यांनी वारंवार शासनाकडे पाठपुरवठा केला, आंदोलने केली परंतु शासनाला जागा आली नाही. याच जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली.


 आज दिनांक २७ मार्च २०२५ रोजी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते ना *श्री अंबादासजी दानवे साहेब* यांनी त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. त्यांच्याशी संवाद साधला, त्यांचे सांत्वन करून धीर दिला. याप्रसंगी बुलडाणा जिल्हा शिवसेनेच्या वतीने स्व.कैलास नागरे यांच्या कुटुंबियांना ५ लक्ष रुपयांची मुलांच्या शिक्षणासाठी व संगोपनासाठी आर्थिक मदतही करण्यात आली.

     यावेळी आ श्री सिद्धार्थ खरात, संपर्क प्रमुख प्रा श्री नरेंद्र खेडेकर, जिल्हा प्रमुख श्री जालिंदर बुधवत, श्री वसंतराव भोजने, सह संपर्क प्रमुख श्री छगन दादा मेहेत्रे, सौ जयश्रीताई शेळके, महिला आघाडी जिल्हा प्रमुख सौ विजयाताई खडसन,  जिल्हा संघटक डॉ श्री गोपाल बच्छिरे, प्रा श्री डी एस लहाने सर, जिल्हा समन्वयक श्री संदीप दादा शेळके, युवासेना जि प्र नंदु कऱ्हाडे, उप जिल्हा प्रमुख प्रा आशिष रहाटे, बद्रि बोडखे, तुकाराम काळपांडे, तालुका प्रमुख दादाराव खार्डे,  महेंद्र पाटील, निंबाजी पांडव, किसनराव धोंडगे, प्रा.सिद्धेश्वर आंधळे, मा जि प सदस्य दिलीप वाघ, शहर प्रमुख गोविंदराव झोरे, किशोर गारोळे, श्रीकांत नागरे, राजू बुधवत, तारामती जायभाये, मोहम्मद सोफियान, म्हसाजी वाघ, आकाश घोडे, रणजीत मरमठ, उल्हास भुसारे, गजानन घुगे, अक्षय ठाकरे, अजय शिवरकर, नितेश देशमुख, नागेश पऱ्हाड, गजानन डहाळके, दिलीप चौधरी यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शिवनी अरमाळ या गावातील माता भगिनी गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित 

Post a Comment

0 Comments