आज 14 एप्रिल 2025 रोजी जिल्हा परिषद हायस्कूल येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 134 वी जयंती साजरी करण्यात आली
सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री दाते सर हे होते तर कार्यक्रमासाठी उपस्थित श्री जाधव सर श्री पुंडे सर सौदाते मॅडम देवचे मॅडम उमरकर मॅडम तसेच रोशन पवार उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात पूजनाने करून विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित भाषणे केली तर शाळेच्या कर्मचारी रोशन पवार यांनी एक गीत सादर सादर केले काही विद्यार्थ्यांनी गीत गात बाबासाहेबांचे विचार व्यक्त केले तसेच देवचे सर जाधव सर मुंडे सर यांनी आपल्या भाषणातून बाबासाहेबांविषयी मुलांना त्यांचे जीवन चरित्र आणि त्यांनी समाजासाठी केलेले कार्य हे सर्वांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले तसेच दाते सर यांनी योग्य दर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग नववीचे विद्यार्थिनी श्रावस्ती भगत पुनम वाघ तर आभार प्रदर्शन हे ने केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी वर्ग नववीच्या विद्यार्थिनी यांनी परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी केला.
0 Comments