बुलढाणा शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आयपीएल मॅच मध्ये हार जीत व जुगार खेळताना व खेळवितांना मिळून आल्याने दोन आरोपींवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे व त्याच्या पथकाने कारवाई करून अटक केले असून ही कारवाई दिनांक 13 एप्रिल रोजी संभाजीनगर बुलढाणा येथे करण्यात आली 13 एप्रिल रोजी बुलढाणा शहर पोलीस स्टेशन हद्दीतील संभाजीनगरात
दोन ईसम हे आयपीएल मॅच मध्ये हार जीत व जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखा पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे व त्यांच्या टीमने धडक कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे
आरोपींचे नांव जगदीश भोसले राहणार संभाजीनगर बुलढाणा व रवी भोसले राहणार संभाजीनगर बुलढाणा यांच्या ताब्यातून एलडी 32 इंच टीव्ही किंमत 15000 रुपये एम आय कंपनीचा मोबाईल किंमत 12 हजार रुपये ओप्पो कंपनीचा मोबाईल किंमत 15हजार रुपये आसा एकूण 42 हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त करून कारवाई करण्यात आली सदरची कारवाई विश्र्व पानसरे पोलीस अधीक्षक बुलढाणा अप्पर पोलीस अधीक्षक बुलढाणा व खामगाव उपविभागीय पोलीस अधिकारी बुलढाणा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक लांडे व पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर स्थानिक गुन्हे शाखा पीआय यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे हेड कॉन्स्टेबल दीपक लेकुरवाडे हेड कॉन्स्टेबल एजाज खान हेट कॉन्स्टेबल दिगंबर कपाटे नाईक पोलीस कॉन्स्टेबल विजय पैठणे पोलीस कॉन्स्टेबल गजानन गोरले महिला कॉन्स्टेबल दिपाली चव्हाण यांनीही कारवाई यशस्वीरित्या पूर्ण केली
0 Comments