Advertisement

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रश्नांबाबत व समाजाच्या विविध समस्यांबाबत कानडे / कानडी समाज सेवाभावी संस्थेची विशेष सभा संपन्न

*विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रश्नांबाबत व समाजाच्या विविध समस्यांबाबत कानडे / कानडी समाज सेवाभावी संस्थेची विशेष सभा संपन्न* 
  दि.६ एप्रिल २०२५ रोजी कानडे / कानडी समाज सेवाभावी संस्थेची मीटिंग पपु. श्रावणगिरीजी महात्मा यांचे आश्रमात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी कानडे / कानडी समाज सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा अध्यक्ष श्री. लक्ष्मण निवृत्ती बोगीर हे होते. सभेला प्रोस्थाहीत करताना श्री.बोगीर यांनी समाजाचा ज्वलंत प्रश्न धनगर तत्सम अनुक्रमांक २९(१३) वर असलेले कानडे येथे कानडे ऐवजी कानडे/कानडी दुरुस्ती प्रकरण कायमस्वरुपी मार्गी लावुन समाजातील विद्यार्थ्यांचे जाती दाखले व जाती पडताळणी चा प्रश्न कायमस्वरुपी मिटावा म्हणून ठराव मांडला तो सर्वानुमते  मंजूर करण्यात आला. तसेच संस्थेचे तालुका निहाय सभासद बनवून संस्थेला बळकटी आणावी. सदर प्रकरणी कामकाजासाठी सर्वांनी एकजुटीने काम करुन निधी उभारावा. याबाबत ठराव मंजूर करण्यात आला. तालुका निहाय अहिल्यानगर अकोले, नाशिक सिन्नर इगतपुरी त्रंबकेश्वर शहापूर जव्हार नांदगाव येवला चांदवड कळवण (सप्तशृंगी गड) कोपरगाव (ओगदी) आदी विभागात भटकंती मुळे जेथे जेथे कानडे / कानडी समाज बांधव स्थायिक झालेले आहेत. त्यांनी  संस्थेचे सभासदत्व स्वीकारुन सामाजिक कार्यात आपला सहभाग नोंदवावा. आदी ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
 सदर सभेच्या यशस्वीतेसाठी कानडे / कानडी समाज सेवाभावी संस्थेचे संचालक  सखाराम भुसनर, कैलास सदगीर, प्रवीण चौधरी, साहेबराव पाटील, संजय बिन्नर, निवृत्ती सदगीर, भाऊसाहेब सदगीर, भाऊलाल बेंडके, धोंडीआप्पा बिन्नर, अशोक सदगीर, विष्णू करवर, दत्तात्रय सदगीर आदी समाज बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments