Advertisement

मराठी भाषेचा प्राधान्याने वापर करण्याची मनसेची मागणी

मराठी भाषेचा प्राधान्याने वापर करण्याची मनसेची मागणी
प्रतिनिधी जळगाव जामोद 
जळगाव जामोद: राज्य शासनाच्या आदेशानुसार व मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आदेशित केल्यानुसार मराठी भाषेचा वापर प्राधान्याने करण्यात यावा, अशी आग्रही विनंती मनसेच्या वतीने भारतीय स्टेट  बैंक प्रशासनाला एका पत्राव्दारे करण्यात आली.आस्थापनेत मराठी भाषिकांना प्राधान्याने घेण्यात यावे, तसेच दैनंदिन
सर्व व्यवहार मराठी भाषेतच करण्यात यावे, आस्थापनाअंतर्गत कार्यरत कोणत्याही अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून मराठी भाषेचा अवमान होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, अशी विनंती मनसे तालुका अध्यक्ष राजू राऊत शहराध्यक्ष  नागेश भटकर मधुकर झाल्टे तालुका उपाध्यक्ष आकाश कपले  तालुका उपाध्यक्ष  सुनील इंगळे आदी
  पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली.

Post a Comment

0 Comments